बिबट्याने पडला 2 वासरांचा फडशा ... चोरगाव परिसरात भीतीचे वातावरण ... - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

27/01/2022

बिबट्याने पडला 2 वासरांचा फडशा ... चोरगाव परिसरात भीतीचे वातावरण ...

 

आमचे पाळधी (प्रतिनिधी) :--

        बिबट्याने पडला 2 वासरांचा फडशा ... चोरगाव परिसरात भीतीचे वातावरण 

      सकाळी 7 वाजताच जिप सदस्य प्रताप गुलाबराव पाटील व माजी सभापती सचिन पवार घटनास्थळी

   आज सकाळी 6 वाजेच्या सुमारास चोरगाव येथे सुपडू अर्जुन सपकाळे यांच्या गोठ्यात बांधलेल्या 2 वासरांचा फडशा बिबट्याने पडला. सदर घटना माहिती पडताच 7 वाजता जिल्हा परिषद सदस्य प्रताप गुलाबराव पाटील व माजी सभापती सचिन पवार त्वरित चोरगाव पोहोचले. त्यांनी तहसीलदार, वनअधिकारी यांना पाचारण केले. 

 

         गावाच्या बाहेर शेतकरी सुपडू अर्जुन सपकाळे यांचा गोठा आहे. नेहमीप्रमाणे सकाळी 6 वाजता म्हशीचे दूध काढून ते घरी गेले. लगेच बिबट्याने या गोठ्यावर हल्ला करीत गोठ्यातील वासराचा फडशा पाडला. बिबट्याने हल्ला केल्याने सपकाळे यांचे किमान पंधरा ते वीस हजारांचे नुकसान झाले आहे. वननिभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पंचनामा केल्यानंतर येथे बिबट्याच्या पायाचे ठसे दिसून आले आहेत.  वनक्षेत्रपाल दत्ता लोंढे ,वनपाल राजकुमार ठाकरे, वनसंरक्षक शिवाजी माळी, वन्य जीव अभ्यासक विवेक देसाई यांनी पंचनामा केला. त्या शेतकऱ्याला लवकरात लवकर मदत मिळवून द्यावी आणि शिवारात कॅमेरे लावून सापळा लावण्याच्या सूचना जिप सदस्य प्रताप गुलाबराव पाटील यांनी केल्या. याप्रसंगी माजी सभापती सचिन पवार, सरपंच ज्ञानेश्वर सोनवणे, उपसरपंच प्रवीण रमेश सोनवणे, अनिल पवार, संतोष अभिमन सोनवने, मस्तानशाह फकीर, जंगू बापू सोनवणे, शिवसैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते. 

                     ➖️   शेतकरी धास्तावले   ➖️

       चोरगाव शिवारातील शेळ्या, मेंढपाळ व पशुपालक शेतकरी मोठय़ा प्रमाणात धास्तावले आहेत.वनविभागाच्याअधिकाऱ्यांनी लवकरात लवकर पिंजरा लावून बिबट्यास जेरबंद करण्यात यावे, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून जिल्हा परिषद सदस्य प्रताप गुलाबरावजी पाटील यांच्याकडे करण्यात आली.






No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp