पत्रकार संदीप महाजन यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा चोपड्यात तीव्र निषेध ... हल्लेखोरांना अटक करा पत्रकारांची मागणी ... - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

11/08/2023

पत्रकार संदीप महाजन यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा चोपड्यात तीव्र निषेध ... हल्लेखोरांना अटक करा पत्रकारांची मागणी ...

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

          पत्रकार संदीप महाजन यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा चोपड्यात तीव्र निषेध ... हल्लेखोरांना अटक करा पत्रकारांची मागणी ...

          चोपडा शहर व तालुका पत्रकार बांधवातर्फे पाचोरा येथील पत्रकारावर भ्याड हल्ला करणाऱ्या गावगुंडावर पत्रकार संरक्षण कायद्यान्वये कडक कारवाई करावी अशी जोरदार मागणी एका निवेदनाद्वारे तहसिलदार भाऊसाहेब थोरात व शहर पोलिस निरीक्षक के.के.पाटील यांच्याकडे करण्यात आली आहे.

         तात्काळ कारवाई न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही दिला आहे. पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांना काही दिवसा अगोदर  पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील यांनी अत्यंत खालच्या पातळीची शिवीगाळ करून मारहाण करणे बाबत धमकी दिली होती. त्यानंतर लगेचच दि.  9 / 8 / 2023 रोजी पत्रकार संदीप महाजन वृत्तांकनावरून परत येत असतांना त्यांच्यावर 3 ते 4 इसमांनी भ्याड हल्ला करीत त्यांना जबर जखमी केले.


           सदर भ्याड हल्ला हा आमदार किशोर पाटील यांच्याच कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप पत्रकार संदीप महाजन यांनी केला आहे. या भ्याड हल्ल्याचा चोपडा  तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांनी एकत्रित येत जाहीर निषेध केला आहे.

         या भ्याड हल्ला करणारे व त्यामागे असणाऱ्या मास्टरमाइंडवर पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल व्हावा तसेच पत्रकार संदीप महाजन व त्यांच्या कुटुंबियांना पोलीस संरक्षण देण्तात यावे अशी मागणीही केली आहे.

          याप्रसंगी चोपडा शहर व तालुक्यातील सर्व पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.



No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp