जीवनात आर्थिक साक्षरता आवश्यक - प्रा.श्रीमती.सुरेखा पालवे. - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

10/08/2023

जीवनात आर्थिक साक्षरता आवश्यक - प्रा.श्रीमती.सुरेखा पालवे.


 जळगाव (प्रतिनिधी) : - -

          जीवनात आर्थिक साक्षरता आवश्यक - प्रा.श्रीमती.सुरेखा पालवे.

          स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय (एम.जे. कॉलेज जळगाव) येथे प्रा. सुरेखा पालवे यांच्या हस्ते वाणिज्य मंडळाचे उद्घाटन संपन्न.

          जळगाव येथील स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय (एम.जे.[स्वायत्त] कॉलेज) जळगाव येथे वाणिज्य मंडळाचे प्रा. श्रीमती. सुरेखा पालवे (सिनेट आणि व्यवस्थापन मंडळ सदस्य क.ब.चौ.उ.म.वि.जळगांव) यांच्या हस्ते नुकतेच उद्घाटन करण्यात आले.


           कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते समई प्रज्वलन करण्यात आले. याप्रसंगी प्रा. सुरेखा पालवे यांना उपप्राचार्य श्रीमती. के.जी.सपकाळे मॅडम यांच्या हस्ते शाल, भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन  सन्मानीत करण्यात आले.

          यावेळी प्रमुख अतिथी प्रा. सुरेखा पालवे यांनी जीवनात आर्थिक साक्षरता महत्त्वाची असून देशाचे जबाबदार नागरिक होण्यासाठी आवश्यक कौशल्ये आत्मसात करणे गरजेचे आहे. असे  प्रतिपादन केले. याचबरोबर त्यांनी पदवी आणि पदव्युत्तर महाविद्यालयीन जीवनात वाणिज्य शाखेचे कोणकोणते  रोजगाराभिमुख अभ्यासक्रम उपलब्ध आहेत हे सांगून वाणिज्य क्षेत्रातील नोकरीच्या विविध संधींसंदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. याप्रसंगी वाणिज्य शाखेचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

          या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या उपप्राचार्या प्रा.करुणा सपकाळे होत्या. तसेच तिन्ही विद्या शाखांचे समन्वयक प्रा. स्वाती बऱ्हाटे, प्रा.उमेश पाटील व प्रा.प्रसाद देसाई व वाणिज्य मंडळ अध्यक्षा प्रा.गौरी अत्तरदे उपस्थित होते.

          या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.जयंत इंगळे, प्रास्ताविक प्रा.गौरी अत्तरदे, प्रमुख अतिथींचा परिचय प्रा. प्रसाद देसाई तर आभारप्रदर्शन प्रा. लालिथा इलांको यांनी केले.

           या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा.डॉ. अतुल इंगळे, प्रा.प्रविण महाजन, प्रा. अर्चना जाधव, प्रा.स्वप्नील धांडे, प्रा.निवेदिता जोशी, प्रा.पूजा सायखेडे, प्रा. ज्योती चौधरी यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp