चोपडा ग्रामीण पोलीसांची धडक कामगिरी ! ! ! गलवाडे बुधगाव जवळ गावठी रायफल जप्त . . . - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

12/08/2023

चोपडा ग्रामीण पोलीसांची धडक कामगिरी ! ! ! गलवाडे बुधगाव जवळ गावठी रायफल जप्त . . .


चोपडा (प्रतिनिधी) : - -

       चोपडा ग्रामीण पोलीसांची धडक कामगिरी ! ! !

   गलवाडे बुधगाव जवळ गावठी रायफल जप्त . . . 

         चोपडा तालुक्यातील ग्रामीण पोलीस हद्दीत गलवाडे बुधगाव जवळ गावठी बनावटीची रायफल सह आरोपी कडून मिळून आली.

           सविस्तर असे की, दोन इसम मोटारसायकलवर जात असताना रात्रीची गस्त घालणारे पोलिसांना ह्या दोघावर संशय आल्याने ह्यांना थांबविण्यासाठी हटकले असता. मोटारसायकलच्या मागच्या सिटवर बसलेला आरोपी पोलीसांना पाहताच मोटार सायकलवरुन उडी मारुन अंधाराचा फायदा घेवुन आरोपी कांतीलाल दुरसिंग पावरा रा.महादेव दोंदवाडे ता. शिरपुर जि.धुळे याने पळ काढला. सदरील गुन्ह्यातील दुसरा आरोपी रमेश मालसिंग पावरा वय 33 रा. महादेव दोंदवाडे ता. शिरपुर जि. धुळे त्याचा जवळ गावठी बनावटीची रायफल हे प्राणघातक अग्नीशस्र आहे हे माहीत असताना देखील विना परवाना स्वताचे फायद्याकरीता जवळ बाळगतांना मिळून आले. पोहेकॉ राकेश तानकू पाटील यांच्या फिर्यादि वरून चोपडा ग्रामीण पोलिस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला आहे.


          आरोपी कडून 80,000 /- रुपयांची एक गावठी बनावटीचा साडे चार फुट रायफलला ड्रेगर लोखंडी, रायफलचे बट लाकडी आडीजात लाकडीचे व पितळी पट्ट्या लावलेले मिळुन आले. तसेच 60,000 /- किमतीची शाईन हिरो होंडा कंपनीची काळ्या रंगाची त्यावर लाल पट्टे असलेली बिना नंबर प्लेट असलेली अशी एकूण 1,40,000 /- चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला

         डी. वाय.एस.पी. ऋषीकेश रावले व पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ. शिंगाणे, व राकेश पाटील हे तपास करीत आहे. आरोपीने ही रायफल जवळपास 18 गुन्ह्यात वापरलेली आहे असेही पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. व एक आरोपीला अटक केली असून दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp