Post Top Ad
Responsive Ads Here
15/06/2024

Home
Unlabelled
शाळेच्या पहिल्या दिवशी वृक्षारोपण करून विवेकानंद विद्यालयाने साजरा केला प्रवेशोत्सव
शाळेच्या पहिल्या दिवशी वृक्षारोपण करून विवेकानंद विद्यालयाने साजरा केला प्रवेशोत्सव
चोपडा येथील विवेकानंद प्रतिष्ठान व संशोधन केंद्र चोपडा संचलित विवेकानंद विद्यालयात आज 15 जून रोजी प्रवेश उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. याप्रसंगी विद्यालयातील सहावीच्या विद्यार्थ्यांनी विद्यालय परिसरामध्ये वृक्षारोपण करून नवीन शैक्षणिक वर्षास सुरुवात केली बँड पथकाने व सुशोभित रांगोळीने विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत केले शालेय परिपाठाने शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाली विद्यालयाचे मुख्याध्यापक व संस्थेचे विश्वस्त नरेंद्र भावे मुख्याध्यापिका आशा चित्ते, संजय सोनवणे यांच्या शुभहस्ते व विद्यार्थी प्रतिनिधींच्या हस्ते पुस्तके व वृक्षाचे पूजन करण्यात आले याप्रसंगी सर्व विभागाचे शिक्षक उपस्थित होते. त्यानंतर शासनातर्फे सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले पर्यावरणाचे संतुलन काळाची गरज लक्षात घेता झाडे लावा झाडे जगवा या आशयाखाली विद्यालयातील उपशिक्षक पवन लाठी, हेमराज पाटील , विजय पाटील, राकेश विसपुते उपशिक्षिका शितल पाटील यांनी परिश्रम घेत सहावीच्या विद्यार्थ्यांसोबत मुख्याध्यापक नरेंद्र भावे यांच्यासह विद्यालय परिसरात वृक्षारोपण करत नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक प्रसाद वैद्य विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी मुख्य फलक लेखन कलाशिक्षक राकेश विसपुते यांनी केले.
Share This

About ✍️ मुख्य संपादक : -- राजेंद्र पाटील
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post Bottom Ad
Responsive Ads Here
No comments:
Post a Comment