राष्ट्र विकासात शिक्षकाची भूमिका महत्वाची - - संदिप वाकचौरे यांचे प्रतिपादन.... - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

14/06/2024

राष्ट्र विकासात शिक्षकाची भूमिका महत्वाची - - संदिप वाकचौरे यांचे प्रतिपादन....

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

          राष्ट्र विकासात शिक्षकाची भूमिका महत्वाची - - संदिप वाकचौरे यांचे प्रतिपादन....

        राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ची यशस्वी अंमलबजावणी व नव्या शैक्षणिक धोरणाचे ध्येय आणि उद्दिष्टे साध्य करण्याची दोरी शिक्षकांच्या हाती असून जर शिक्षकांनी मनापासून वर्ग स्तरावर नवे शैक्षणिक धोरण आपल्या व्यवसायावर निष्ठा ठेवून कार्य केले व अध्ययन निष्पत्ती नुसार अध्ययन अनुभव दिले तर संपूर्ण देशात नवे शैक्षणिक धोरण यशस्वीपणे राबविले जाईल व भारतातील एकही मुल शिक्षणापासून वंचित राहणार नाही व भारत देश लवकरच विकसित राष्ट्र होईल असा विश्वास संदिप वाक् चौरे ( सदस्य - व्यवस्थापन समिती - नवे शैक्षणिक धोरण ) यांनी व्यक्त केला. ते पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्था आयोजित दोन दिवसीय कार्यशाळेत बोलत होते.

         राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची मुख्य वैशिष्टये प्रत्येक शिक्षकास माहीत असावीत. बहुपैलूत्व, पूर्वाध्यापन वर्ग, खेळ आधारीत शिक्षण, शिक्षणातून आनंद, अध्ययन निष्पत्ती, अभ्यासक्रम व अध्यापन शास्त्रीय रचनेत बदल आदी बाबींवर त्यांनी विवेचन केले. अजित पाफाळे ( मनशक्ती केन्द्र लोणावळा ) यांनी बौद्धिक, भावनिक, सामजिक व आनंदी विकास कसा साधावा तसेच संतुलित आहार, वाचनाचे महत्व, ध्यानधारणा इत्यादी विषयांवर प्रभावीपणे मार्गदर्शन केले. साहित्यातून मूल्यांची रूजवणुक या विषयावर आनंददायी व हसत खेळत प्रा. वा. ना. आंधळे यांनी विवेचन केले.
           सदर दोन दिवसीय कार्यशाळेस संस्थेचे अध्यक्ष डॉ सुरेश बोरोले,संचालक पंकज बोरोले , उपाध्यक्ष अविनाश राणे व सौ. दिपाली बोरोले पूर्ण वेळ उपस्थित राहिले. सदर कार्यशाळेचा लाभ 150 शिक्षक - शिक्षिकांनी घेतला. सदर कार्यशाळे दरम्यान चहा, नाश्ता व जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. कार्यशाळेची वेळ सकाळी 8 सायंकाळी 5 वाजे पर्यंत होती.

         दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेस अजित पाफाळे ( मनशक्ती केन्द्र - लोणावळा ) , संदीप वाक् चौरे ( सदस्य - संपादन समिती NEP ) ,  उमेश डोंगरे ( माजी उपशिक्षणाधिकारी तसेच SCERT व यशदा विषयतज्ञ ) , परशूराम पावसे ( माजी शिक्षणाधिकारी - पुणे, हिंगोली, नगर ) , मनिष शिंदे ( पिंपरी - चिंचवड, पुणे ) , प्रा. वा. ना. आंधळे ( कवी व साहित्यिक - एरंडोल ) आदि वक्ते उपस्थित होते.

          सदर दोन दिवसीय कार्यशाळेस डॉ.  सुरेश पंडीत बोरोले ( अध्यक्ष - पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्था ) ,  पंकज बोरोले ( संचालक - पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्था  ) , अविनाश राणे ( उपाध्यक्ष - पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्था ) , सौ. दिपाली बोरोले , एम. व्ही. पाटील ( मुख्याध्यापक - प्राथमिक विभाग ) , व्ही. आर. पाटील ( मुख्याध्यापक - माध्य. व उच्च माध्यमिक विभाग ) , प्रो. आर. आर. अत्तरदे ( प्राचार्य - पंकज कला व विज्ञान महाविद्यालय ) , मिलिंद पाटील ( प्राचार्य - पंकज ग्लोबल पब्लिक स्कूल ) , केतन माळी ( प्राचार्य - पंकज इंग्लिश मिडीयम स्कूल ) , सौ. रेखा पाटील ( पंकज बालसंस्कार केंद्र ) तसेच सर्व विभागातील शिक्षक - शिक्षिका उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp