तांदळवाडी जिल्हा परिषद शाळेच्या आवारात स्वच्छतेचा ..... अभाव (भाग १)
तांदळवाडी ता चोपडा येथील जिल्हा परीषद प्राथमिक शाळेच्या आवारात स्वच्छतेचा अभाव नेहमी दिसून येत असतो. स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ भारताचे ध्येय साध्य करण्याच्या अनुषंगाने एक ते १५ सप्टेंबर दरम्यान शाळाशाळांत स्वच्छ भारत पंधरवडा साजरा केला जातो. ‘स्वच्छता हे काम नसून ती एक चांगली सवय आहे,’ या भूमिकेतून कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. वर्ग खोल्यांच्या बाजूला अतीशय दुर्गंध, अस्वच्छतेचा अभाव, काटेरी झुडपे तुटलेले प्रवेशद्वार अशी धोकादायक अवस्था आहे, ही जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील तांदळवाडी जिल्हा परिषद शाळांची कहाणी आहे. आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरत काही शाळा डिजिटल झाल्या असल्या तरी प्राथमिक सुविधांची मात्र वानवा दिसून येते. बहुतांश दिवसांपासून शाळा सुरू झाल्या असून विद्यार्थ्यांसाठी कुठलीही व्यवस्था याठिकाणी दिसून येत नाही.
सविस्तर वृत्त असे की तांदळवाडी जिल्हा परिषद शाळा स्वातंत्र्य काळा नंतर सुरू झाली आहे. सुरवातीला सन १९८५ पासुन याठिकाणी तबला पेटीवर प्रार्थना व्हायची, त्यावेळची परिस्थिती वेगळीच होती .कारण गावातील सगळी पोरं जिल्हा परिषद शाळेतच शिक्षण घेत होती. त्यावेळी पालकांचे शाळेकडे विशेष लक्ष होते, मात्र आता गावातील पोरांची शहराच्या खाजगी शाळेकडे ओढ निर्माण झाली आहे. यामुळे गावातील पालक वर्गाचेही जिल्हा परिषद शाळेकडे दुर्लक्ष झाले आहे.
तांदळवाडी जिल्हा परिषद शाळेच्या आवारात रात्री लघुशंका करणारे तसेच पान बार खाऊन ओट्याच्या बाजुला थुंकणारे ही नजरेस पडतांना दिसून येतात. सकाळी शाळा भरली की शिक्षकांना ते पाण्याने साफ करावे लागते ,शाळेच्या ओट्यावर पडलेले गुरांचे शेण शिक्षकच उचलतात अशी व्यथा शिक्षकांनी पत्रकारांसमोर मांडली. शिक्षक विद्यार्थी घडवतील की लघुशंका साफ करतील याकडे शालेय शिक्षण समीतीने जातीने लक्ष द्यायला पाहिजे. आपले पाल्य शाळेत कोणत्या परीस्थिती शिक्षण घेत आहेत, शालेय पोषण आहार कुठे व कसा शिजवला जात आहे, तो पोषण आहार व्यवस्थित शिजवला आहे का? पोषण आहार शिजवण्यासाठी शाळेत स्वतंत्र खोली आहे का? ज्या ठिकाणी पोषण आहार शिजवला जायायचा ती खोली बारमाही ओलसर असते या सर्व गोष्टींकडे पालकांनी आवर्जून लक्ष देणे गरजेचे आहे. विद्यार्थी व शिक्षकांना लघुशंका करण्यासाठी रस्त्यावर अथवा गाड रस्त्यावर जावे लागते परंतू महिला शिक्षिका लघुशंकेसाठी कुठे जातील हा प्रश्न मोठा गंभीर आहे.मागील काही वर्षापूर्वी जिल्हा परिषद शाळेच्या खालच्या बाजूला संडास व मुतारी बांधण्यात आली होती.सध्यातरी तीची अवस्था पाहण्यासारखी झाली आहे. आजूबाजूला जमीण खचलेली, काटेरी मोठी झाडं, पडलेल्या भिंती पहावयास मिळतात अशा ठिकाणी महिला शिक्षिका एकटी कशी जाईल. अशा वेळेस एकच म्हणावे लागेल तांदळवाडी गावातील जनता मस्त आहे - या ठिकाणी शिक्षक मात्र त्रस्त आहेत.

No comments:
Post a Comment