विवेकानंद विद्यालयात मुंबई येथील सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायक पंडित डॉक्टर राजा काळे यांचे एक दिवसीय गायन शिबिर संपन्न - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

31/07/2023

विवेकानंद विद्यालयात मुंबई येथील सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायक पंडित डॉक्टर राजा काळे यांचे एक दिवसीय गायन शिबिर संपन्न

चोपडा (प्रतिनिधी) : - -
           विवेकानंद विद्यालयात मुंबई येथील सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायक पंडित डॉक्टर राजा काळे यांचे एक दिवसीय गायन शिबिर संपन्न
           चोपडा येथील विवेकानंद विद्यालयात 30 जुलै 2023 रोजी सकाळी आठ ते दुपारी साडेबारा या वेळात सुप्रसिद्ध गायक पंडित जितेंद्र अभिषेकी यांचे ज्येष्ठ शिष्य पंडित डॉक्टर राजा काळे, मुंबई यांचे - गायन या विषयावर एक दिवसाचे शिबिर संपन्न झाले. शिबिराची सुरुवात सरस्वती देवीच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलन करून करण्यात आली.
          पंडित डॉक्टर राजा काळे व त्यांच्या सोबत हार्मोनियम वादनासाठी वसई येथून आलेले श्याम जोशी या दोघांचा यथोचित सन्मान करण्यात आला. तबल्याची साथ नरेंद्र भावे व श्रेयस भावे यांनी केली. संगीत विषय मानवी जीवनात किती महत्त्वाचा व अर्थपूर्ण आहे, या संदर्भात साध्या सोप्या भाषेत माहिती देत गायन कलेबद्दल छोट्या छोट्या पण खूप महत्त्वाच्या गोष्टींचे पंडितजींनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत, गायन कला कशी आत्मसात करावी ? कसा सराव करावा याचे मोलाचे मार्गदर्शन प्रात्यक्षिकासह केले. व काही नवनवीन रचना विद्यार्थ्यांकडून गाऊनही घेतल्या. कोणती एक कला आत्मसाथ केल्यामुळे माणूस चांगल्या संस्कारांनी कसा घडतो, त्याच्यात चांगली मूल्ये कशी रुजतात, हे उत्तम उदाहरणांसह दाखले दिले. देशात, परदेशात मोठमोठ्या मैफल गाजवणारे पंडितजी सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या चोपडा या छोट्याशा शहरातील विवेकानंद विद्यालयात येणे व तेथील विद्यार्थ्यांना गायन कलेबद्दल शिक्षण देणे हे विद्यालयाचे व विद्यार्थ्यांचे भाग्यच. विद्यालयातील व चोपडा शहरातील संगीत विषयाचे क्लास करणारे विद्यार्थी असे मिळून शेकडो विद्यार्थ्यांनी शिबिर यशस्वीरित्या पूर्ण केले. त्याबद्दल विद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र ही देण्यात आले.
          याप्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विकास हरताळकर ,सचिव अॅड. रवींद्र जैन, सहसचिव डॉ. विनीत हरताळकर, विलास पाटील सर खेडीभोकरीकर, विश्वस्त व मुख्याध्यापक नरेंद्र भावे, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका आशा चित्ते , यांच्यासह सर्व विभागाचे शिक्षकवृंद , गावात संगित क्लास चालवणारे संगीत शिक्षक, संगीत प्रेमी पालक वर्ग, श्रोते उपस्थित होते. शिबिराचे फलक लेखन व शिबिरार्थी विद्यार्थ्यांची पूर्वतयारी कलाशिक्षक राकेश विसपुते यांनी केली.
             कार्यक्रमाचे सूत्रसंचलन उपशिक्षिका माधुरी हळपे व आभार प्रदर्शन मुख्याध्यापक नरेंद्र भावे यांनी केले. शिबिर संपन्नतेसाठी पवन लाठी यांच्यासह सर्व शिक्षकवृंद, कर्मचारीवृंद यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp