कर्जाने आश्रम शाळेत विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ : अखिल भारतीय आदिवासी परिषद संघटने कडून तहसीलदार यांना निवेदन ..... - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

29/07/2023

कर्जाने आश्रम शाळेत विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ : अखिल भारतीय आदिवासी परिषद संघटने कडून तहसीलदार यांना निवेदन .....

चोपडा (प्रतिनिधी) : - -
           शासकीय आदिवासी आश्रम शाळा कर्जाने येथील विद्यार्थ्यांच्या जिवाशी होतोय खेळ ; अखिल भारतीय आदिवासी परिषद संघटनेकडुन तहसिलदार यांना निवेदन......
        गृहपाल असतात सतत गैरहजर......
          शरदचंद्रिका पाटील पो. बे. शासकीय आदिवासी आश्रम शाळा कर्जाने येथील आदिवासी विद्यार्थ्यांना त्रास होत आहे. याबद्दल विध्यार्थ्यांना विचार पूस केली असता आम्हाला जेवणामध्ये सतत एकच मेनू दिला जातो आणि त्यामध्ये अळी पडलेले जेवण विद्यार्थ्यांनां देत असतात. जेवणाच्या वेळेला मुलांना जेवण वाढण्यासाठी सागितले जाते व तेथील कर्मचारी वाढत नाही व जेवनाची मेनू फलक दर्शनी जागेवर लावलेले नाही. विशेष म्हणजे मुदत संपलेले आहार अन्न मुलांना शिजवून देतात, वसतिगृहातील शौचालयची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था नाही मुख्याध्यापक शाळेत वेळेवर उपस्थित राहत नाही
           मुला-मुलीचे वसतिगृह येथील शौचालयाची साफ सफाई मुलीकडून केली जाते, बायोलोजी शिक्षक नाही, मुलींचे वसतिगृह येथील गृहपाल हर्षली प्रवीण पाटील सतत गैरहजर असतात व मुलीना सतत त्रास देतात तसेच निवासीस्थान नाही. याबद्दल मुख्याध्यापक श्री.सावकारे सर यांना विध्यार्थी यांनी वारंवार तक्रार करून सुद्धा त्याकडे ते लक्ष देत नाहीत असे विध्यार्थीनी विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. सदर शाळेत सहाय्यक प्रकल्प अधिकारी संदीप पाटील आले असता वरील समस्याचे लेखी स्वरुपात विषय मांडण्यात आल्या.
          सदर विषयाच्या समस्या सोडविण्यात याव्यात व येथील मुख्याध्यापक गृहपाल यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी व विद्यार्थ्यांना न्याय मिळण्यात यावे. जर वरील समस्या सोडविल्या नाही. तर अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद शाखा - चोपडा दिनांक 7 / 8 / 2023 रोजी विद्यार्थी आमरण उपोषणाला बसणार आहेत. यावेळी उपस्थीत पदाधिकारी पदाधिकारी नामा पावरा जळगाव जिल्हाध्यक्ष, करण शेवाळे उत्तर  महारांष्ट्र प्रसिद्धी प्रमुख, सचिन पावरा चोपडा तालुकाध्यक्ष आदी उपस्थीत होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp