उर्वेश साळुंखे यांच्या कडुन संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त पर्यावरण वाचवण्यासाठी जनजागृती.... - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

20/12/2023

उर्वेश साळुंखे यांच्या कडुन संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त पर्यावरण वाचवण्यासाठी जनजागृती....

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

          उर्वेश साळुंखे यांच्या कडुन संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त पर्यावरण वाचवण्यासाठी जनजागृती

         बुधगाव येथील रहिवासी उर्वेश साळुंखे यांनी संत गाडगेबाबा पुण्यतिथी निमित्त चोपडा येथे नगरपरिषद समोर पर्यावरण वाचवण्यासाठी जनजागृती केली. सकाळी ठिक 11 वाजता संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून या जनजागृती कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.

         नागरिकांन मध्ये जनजागृती करत असताना लक्ष वेधण्यासाठी उर्वेश साळुंखे यांनी सर्व प्लास्टिकच्या पिशव्या आपल्या अंगावर लावल्या होत्या. परिसराची स्वच्छता केली पाहिजे व प्लास्टिकचा वापर कमी झाला पाहिजे यांचे घोष वाक्याची पत्रिके छापून नागरिकांन मध्ये वाटप केली. लोकांना स्वच्छतेचे व प्लास्टिकचे न वापरण्याचे महत्व सांगण्यात आले.

         या जनजागृती मोहिमेला पाठिंबा दर्शविण्यासाठी देण्यात येणाऱ्या निवेदनावर असंख्य नागरिकांनी सह्य केल्या. या नंतर दुपारी 2 : 30 वाजता तहसिलदार भाऊसाहेब थोरात यांना व मुख्याधिकारी नगरपरिषद चोपडा यांना निवेदन देण्यात आले.

         या अनोखा पर्यावरण बचाव जनजागृती आंदोलनाला असंख्य नागरिकां सह माजी विधानसभा अध्यक्ष अरूणभाई गुजराथी , मा.आ. कैलास पाटील , चो.का.सा चेअरमन चंद्रहास गुजराथी , अजितदादा समर्थक सुनील पाटील (वाळकी) , चो.सा.का  माजी. चेअरमन घनशाम पाटील , सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी, पत्रकार, पर्यावरण प्रेमी नागरिकांनी या जनजागृती आंदोलनाला प्रत्यक्ष भेटून पाठिंबा दिला. या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी जळगाव , उपमुख्यमंत्री अजित पवार , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवण्यात आल्या.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp