नंदिनीबाई वामनराव मुलींचे विद्यालय व ज्युनिअर कॉलेज जळगाव यांच्यातर्फे आयोजित जिल्हास्तरीय आनंदयात्री डॉक्टर अण्णासाहेब जी डी बेंडाळे वकृत्व स्पर्धा संपन्न . . . - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

19/12/2023

नंदिनीबाई वामनराव मुलींचे विद्यालय व ज्युनिअर कॉलेज जळगाव यांच्यातर्फे आयोजित जिल्हास्तरीय आनंदयात्री डॉक्टर अण्णासाहेब जी डी बेंडाळे वकृत्व स्पर्धा संपन्न . . .

 

जळगाव (प्रतिनिधी) : - -

         नंदिनीबाई वामनराव मुलींचे विद्यालय व ज्युनिअर कॉलेज जळगाव यांच्यातर्फे आयोजित जिल्हास्तरीय आनंदयात्री डॉक्टर अण्णासाहेब जी डी बेंडाळे वकृत्व स्पर्धा संपन्न . . .

         नंदिनीबाई वामनराव मुलींचे विद्यालय व ज्युनिअर कॉलेज जळगाव यांच्यातर्फे आयोजित जिल्हास्तरीय आनंदयात्री डॉक्टर अण्णासाहेब जी डी बेंडाळे वकृत्व स्पर्धा 2023 दिनांक 19 / 12 / 2023 (मंगळवार) रोजी  घेण्यात आली होती. सदर स्पर्धेसाठी संपूर्ण जळगाव जिल्ह्यातून 50 च्या वर शाळांनी व 20 कनिष्ठ महाविद्यालयानी सहभाग नोंदविला होता. सदर स्पर्धेचे उद्घाटन सकाळी विद्यालयाच्या धांडे सभागृहामध्ये किरण बेंडाळे यांच्या हस्ते करण्यात आले.

          सकाळ विभागात सूत्रसंचालन प्रा. स्वाती पाटील व प्रा. टी एस चौधरी यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कॉलेजचे समन्वयक प्राध्यापक आर डी वराडे यांनी केले. नंतर विद्यालयातील संगीत चमुने इश स्तवन व स्वागत गीत सादर केले. नंतर स्पर्धेला सुरुवात झाली. बक्षीस वितरण लेवा युनियन चे सह सचिव प्रा.व.पू.होले याच्या हस्ते करण्यात आले..

          वकृत्व स्पर्धेत माध्यमिक विभागामध्ये  प्रथम क्रमांक आर. टी. काबरा विद्यालयातील कु. स्वराली परेश पाठक रोख रक्कम ₹ 5000 व विद्यालयासाठी ट्रॉफी देण्यात आली. तसेच द्वितीय क्रमांक नंदिनीबाई वामनराव मुलींचे विद्यालया ची  कु. गायत्री चंद्रकांत ठाकरे ₹ 3001 व शाळेसाठी ट्रॉफी ; तृतीय क्रमांक ब गो शानबाग विद्यालयातील कु.चंचल भागवत सिंग पाटील रोख रक्कम ₹ 1500 व शाळेसाठी ट्रॉफी देण्यात आली तसेच उत्तेजनार्थ अँग्लो उर्दू विद्यालयातील कु. मसीरा रउफ शहा रोख रक्कम ₹ 500 व उत्तेजनार्थ द्वितीय बक्षीस प. न. लुंकड विद्यालय जळगाव विद्यालयातील कु. संस्कृती पंकज पवनीकर हिला ₹ 500 व प्रमाणपत्र देण्यात आले. 

         जूनियर कॉलेज गटा मधून प्रथम क्रमांक जी एच रायसोनी महाविद्यालय जळगाव कु. सुमित दीपक खैरे यास ₹ 5001 रोख रक्कम व शाळेसाठी ट्रॉफी देण्यात आली ; द्वितीय क्रमांक पी.आर. कला व वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय  धरणगाव येथील तुषार अनिल पाटील रोख रक्कम ₹ 3001 व शाळेसाठी ट्रॉफी ; तृतीय क्रमांकके नारखेडे जुनियर कॉलेज ची कु. नियती राजेंद्र सोनार रोख रक्कम ₹ 1500 व शाळेसाठी ट्रॉफी देण्यात आली ; उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक यश विजय कोळी महात्मा गांधी जुनियर कॉलेज वरणगाव यास रोख रक्कम ₹ 500 ; द्वितीय क्रमांक कु. प्रिया राजबहादुरसिंग परिहार डॉक्टर जी डी बेंडाळे महाविद्यालय जळगाव हिस रोख रक्कम ₹ 500 मिळाले. कार्यक्रमातला संस्थेचे सहसचिव प्रमुख पाहुणे म्हणून व पु होले. सर तर कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक किरण बेंडाळे उपस्थित होते.

         कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती सी एस पाटील मॅडम उपप्राचार्या एस एस नेमाडे मॅडम पर्यवेक्षक वी एस सैंदाणे सर विद्यालयाचे समन्वयक श्री आर डी वराडे सर तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मदत केली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp