वाळू माफियांचा उदंडपणा ! ! प्रांताधिकाऱ्यांच्या खाजगी वाहणाला धडक ; तलाठ्याला जीवे मारण्याची धमकी... - S Maharastra 7 News

S Maharastra 7  News

✍️ मुख्य संपादक :- राजेंद्र पाटील

S Maharashtra 7 News

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Post Top Ad

Responsive Ads Here

20/12/2023

वाळू माफियांचा उदंडपणा ! ! प्रांताधिकाऱ्यांच्या खाजगी वाहणाला धडक ; तलाठ्याला जीवे मारण्याची धमकी...

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

          वाळू माफियांचा उदंडपण ! ! प्रांताधिकाऱ्यांच्या खाजगी वाहणाला धडक ; तलाठ्याला जीवे मारण्याची धमकी...

         चोपडा येथील उपविभागिय अधिकारी तथा प्रांताधिकारी, चोपडा एकनाथ दत्तात्रय बंगाळे हे स्वतः त्यांचे खाजगी वाहन MH 20 FY 0216 चालवून जळगाव येथून जिल्हाधिकारी कार्यालयातून कार्यालयीन मीटिंग आटोपून चोपडा येथे परत येत असतांना खडगाव येथे एक वाळुचे भरलेला ट्रक्टर वाहतुक करतांना त्यांच्या निदर्शनास आले , त्यांनी खडगाव येथील तलाठी गुलाबसिंग पावरा यांना त्यांच्या खाजगी वाहनातून सांगितले की , सदर ट्रॅक्टर मध्ये अवैध वाळू आहे. तुम्ही त्या ट्रॅक्टर चालकास थांबवा.

         त्यानुसार अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचा तलाठी पावरा यांनी पाठलाग केला. तलाठी पावरा यांनी ट्रॅक्टर चालकास ट्रॅक्टर थांबविण्याचे सांगितले असताही ट्रॅक्टर चालक राजेश विकास मालवे याने ट्रॅक्टर थांबवले नाही. उलट तलाठी गुलाबसिंग पावरा यांना शिवीगाळ करून तू साईडला झाला नाही तर तुला उडवून देईन अशी धमकी देऊन ट्रॅक्टर पळून नेण्याचा इराद्यात होता.

          प्रांताधिकारी एकनाथ दत्तात्रय बंगाळे यांनी त्यांच्या खाजगी वाहनाचा वेग वाढवून सदर अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला ओव्हरटेक केले व तलाठी गुलाबसिंग पावरा यांनीही मोटरसायकल वरून सदर अवैध बाळू वाहून नेणाऱ्या ट्रॅक्टरला ओव्हरटेक केले व ट्रॅक्टरच्या पुढे मोटरसायकल उभी केली आणि प्रांताधिकारी बंगाळे यांनी त्यांचे खाजगी वाहन ट्रॅक्टर पुढे उभे केले तर त्या अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकाने राजेश विकास मालवे (वय 23 रा. खरंग ता. चोपडा) याने धडक दिली. त्यात प्रांताधिकारी बंगाळे हे बालबाल बचावले. त्यात प्रांताधिकारी यांच्या उजव्या हाताच्या बोटाला दुखापत झाली असून वाहनाचे प्रचंड नुकसान झाले आहे.

        सदर घटनेची चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये प्रांताधिकारी एकनाथ दत्तात्र बंगाळे (32) यांच्या फिर्यादी वरून चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला अवैध वाळु वाहतूक करणारे ट्रैक्टर मालक पूर्ण नाव माहिती नाही या च्या विरोधात कलम 353 , 332 , 379 , 504 , 506 , 427 महसूल अधिनियम कलम 48 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यावेळी तहसीलदार भाऊसाहेब थोरात व नायब तहसीलदार सचिन बांबळे व इतर कर्मचारी गुन्हा दाखल करते वेळी ग्रामीण पोलीस स्टेशनला हजर होते. एक आरोपीला पोलीसांनी ताब्यात घेतला असून पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी अमळनेर भाग , अमळनेर यांच्या मार्गदर्शनाखाली सहापोनि शेषराव नितनवरे करीत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज