लासुर ता. चोपडा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर संपन्न..... - S Maharastra 7 News

S Maharastra 7  News

✍️ मुख्य संपादक :- राजेंद्र पाटील

S Maharashtra 7 News

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Post Top Ad

Responsive Ads Here

13/06/2025

लासुर ता. चोपडा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर संपन्न.....


 चोपडा (प्रतिनिधी) : - -

          लासुर ता. चोपडा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर संपन्न.....

          महाराष्ट्र राज्य शासनाच्या “ छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान ” अंतर्गत चोपडा तालुक्यातील सर्व गावांना एकत्रित महसूल व सर्वसमावेशक शासकीय सेवा शिबीराचे आयोजन करण्यात आले. उद्घाटन प्रा. आ. चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी त्यांनी लाभार्थ्यांशी संवाद साधून विविध योजनेचे लाभ व धनादेश प्रदान केले.
           या शिबिरात 1200 ते 1500 नागरिकांनी उपस्थित राहून विविध योजनांचा लाभ घेतला. शासनाच्या विविध विभागांनी एकत्रितपणे सेवा उपलब्ध करून दिल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या गावातच प्रशासनाची सुविधा सुलभतेने मिळाली.

          या कार्यक्रमात तहसीलदार चोपडा भाऊसाहेब थोरात, गटविकास अधिकारी अनिल विसावे, राजपूत सार्वजनिक बांधकाम विभाग, तालुका आरोग्य अधिकारी, वनपरिक्षेत्र अधिकारी, सर्व तालुका स्तरीय अधिकारी, कर्मचारी व मंडळ स्तरावरील यंत्रणा उपस्थित होते.
          या कार्यक्रम सूत्रसंचालन व समारोप भूषण पाटील (ग्राम महसूल अधिकारी, तहसील कार्यालय चोपडा) यांनी केले. या शिबिरामुळे नागरिकांना गावातच शासनाच्या विविध सेवा मिळाल्याने प्रशासना विषयी समाधान व सकारात्मक भावना व्यक्त करण्यात आली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज