दि चोपडा पीपल्स को-ऑप. बँक लि., चोपडा कडून ‘गो ग्रीन’ कॅब कंपनीस पहिल्या टप्प्यात 39 प्रदूषणमुक्त वाहनांसाठी अर्थसहाय्य..... - S Maharastra 7 News

S Maharastra 7  News

✍️ मुख्य संपादक :- राजेंद्र पाटील

S Maharashtra 7 News

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Post Top Ad

Responsive Ads Here

24/07/2025

दि चोपडा पीपल्स को-ऑप. बँक लि., चोपडा कडून ‘गो ग्रीन’ कॅब कंपनीस पहिल्या टप्प्यात 39 प्रदूषणमुक्त वाहनांसाठी अर्थसहाय्य.....

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

          दि चोपडा पीपल्स को-ऑप. बँक लि., चोपडा कडून ‘गो ग्रीन’ कॅब कंपनीस पहिल्या टप्प्यात 39 प्रदूषणमुक्त वाहनांसाठी अर्थसहाय्य.....

         स्वच्छ, हरित व पर्यावरणपूरक वाहतुकीला चालना देण्यासाठी दि चोपडा पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, चोपडा यांच्या वतीने गो ग्रीन या नाशिकस्थित कॅब कंपनीला 39 प्रदूषणमुक्त वाहनांसाठी आर्थिक सहाय्य करण्यात आले आहे.

           या उपक्रमाचा उद्घाटन सोहळा नुकताच पुणे येथे पार पडला. याप्रसंगी बँकेचे अध्यक्ष श्री. चंद्रहास गुजराथी, गो ग्रीनचे मालक श्री. क्षमिक शाह आणि बँकेचे डिरेक्ट सेलिंग एजंट (DSA) श्री. प्रेम अडवाणी उपस्थित होते.

          या उद्घाटनप्रसंगी बोलताना श्री. चंद्रहास गुजराथी म्हणाले, "समाजातील सकारात्मक बदल घडवणाऱ्या आणि पर्यावरण रक्षणासाठी कार्य करणाऱ्या उपक्रमांना आर्थिक मदत देणे हा आमच्या बँकेचा नेहमीच एक उद्देश राहिला आहे. 'गो ग्रीन'चा हा पुढाकार आणि आमचा सहभाग हरित भविष्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. पहिल्या टप्प्यात ३९ कॅबचे वितरण करताना मला व संचालक मंडळाला मनस्वी आनंद होत आहे."
           श्री. क्षमिक शाह यांनी बँकेच्या सहकार्याबद्दल आभार मानत सांगितले, "या आर्थिक मदतीमुळे आम्हाला आमचा प्रदूषणमुक्त कॅब ताफा विस्तारता येणार असून नाशिक, पुणे आणि मुंबई मधील नागरिकांना पर्यावरणपूरक व किफायतशीर वाहतुकीची सेवा देता येईल. हरित पर्याय ही काळाची गरज आहे. आम्हाला गो ग्रीन च्या माध्यमातून सुमारे 150 कॅब चा ताफा उभारण्याचा संकल्प आहे."

         श्री. प्रेम अडवाणी यांनी सहकार्याचे महत्त्व अधोरेखित करत सांगितले, "हरित तंत्रज्ञानाचा स्वीकार आणि बँकिंग क्षेत्रातील सकारात्मक सहभागामुळे समाजात परिवर्तन घडत आहे. अशा उपक्रमांमुळे सहकार बँका आणि नवउद्योजक यांच्यातील समन्वय अधिक बळकट होईल."

        या अर्थसहाय्यामुळे ‘गो ग्रीन’ कॅब कंपनीकडील नवीन प्रदूषणमुक्त वाहने लवकरच नाशिक पुणे आणि मुंबई शहरातील विविध मार्गांवर कार्यरत होतील, ज्यामुळे कार्बन उत्सर्जनात घट होऊन नागरिकांना स्वच्छ वाहतुकीचा लाभ मिळणार आहे.

        हा उपक्रम सहकार क्षेत्र व हरित उपक्रमांतील भागीदारीचे आदर्श उदाहरण ठरत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज