चोपडा महाविद्यालयातील एचएससी परीक्षा बैठक व्यवस्था ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाची बारावीची परीक्षा शहरातील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयात (केंद्र क्रमांक 840) होत असून 12 वी विज्ञानच्या विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था महाविद्यालयातील रायगड व सह्याद्री इमारतीत असेल.12 वी कला वर्गाची बैठक व्यवस्था श्रीमती शरश्चंद्रिका सुरेश पाटील तंत्रनिकेतन काॕलेज इमारतीत व 12 वी वाणिज्य वर्गाची बैठक व्यवस्था श्रीमती शरश्चंद्रिका सुरेश पाटील तंत्रनिकेतन काॕलेज इमारत व प्रतापगड इमारतीत असेल. सकाळ सत्राचा पेपर10.30 ते 2.00 व दुपार सत्राचा पेपर 3.00 ते 6.30 या वेळेत होईल मात्र सकाळ सत्रातील विद्यार्थ्यांनी 9.30 वाजता व दुपार सत्रातील विद्यार्थ्यांनी 2.30 वाजता केंद्रात हजर असावे. परीक्षार्थीकडे परीक्षेचे हाॕलतिकिट, स्वतःचे सॕनिटाईझर , मास्क व पाण्याची बाटली असणे आवश्यक आहे. तणावविरहित व काॕपीमुक्त वातावरणात परीक्षार्थिंनी परीक्षेला सामोरे जाण्याचे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डाॕ. डी ए सूर्यवंशी व कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य केंद्रसंचालक बी एस हळपे यांनी केले आहे.

No comments:
Post a Comment