अफवांना बळी पडू नये योग्य तो बंदोबस्त लावण्यात आलेला आहे सर्वांनी शांतता राखावी : - -
पो. नि. के. के. पाटील यांचे आवाहन
चोपडा शहरातील सर्व शांतता प्रिय नागरिकांना चोपडा शहर पोलिसांच्या वतीने अवाहन करण्यात येते काही दिवसा पुर्वी एका मुस्लिम समाजाच्या मुली सोबत एक भोई समाजाच्या मुलाने लग्न केल्याच्या कारणावरून मुलीचे नातेवाईक व मुलाचे नातेवाईक यांच्या मध्ये आज भांडण झालेले आहे.
त्या भांडणात जखमी इसम हा तडीपार आहे. आणी त्याच्याशी भांडण करणारे इसम हे कुरेशी नाहीत ते पठाण मुस्लिम आहेत आणी गॅरेज व मांडे तयार करण्याचे काम करतात. यातील जखमी ची प्रकृती ठीक आहे.
सदर घटनेला कोणीही जातीय रंग देऊ नये दोन कुटुंबातील भांडण आहे तरी कोणीही दोन समाजात तेढ निर्माण होईल अशा प्रकारच्या अफवा कोणीही पसरवू नये भांडण करणारे दोन आरोपी ताब्यात घेतलेले आहेत इतर आरोपींचा शोध सुरु आहे तरी सर्वांनी शांतता राखावी कोणीही अफवांना बळी पडू नये योग्य तो बंदोबस्त लावण्यात आलेला आहे सर्वांनी शांतता राखावी हि विनंती असे आवाहन चोपडा शहर पोलिसांच्या केले आहे.
No comments:
Post a Comment