पक्षी अभ्यासकांनी वाचविले युरेशियन पाहुण्याचे प्राण... - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

29/03/2022

पक्षी अभ्यासकांनी वाचविले युरेशियन पाहुण्याचे प्राण...

चोपडा (प्रतिनिधी) :-- 
    हिवाळ्यात संपूर्ण भारतीय उपखंडात आलेले परदेशी पाहुणे वाढत्या उन्हाबरोबर मायदेशी परत 
जाण्यासाठी परतीच्या मार्गाने स्थलांतरित होत आहेत.दक्षिण भारतातील मोठ्या जलाशयावरून परततांना खानदेश हा पक्षी स्थलांतर उड्डाण मार्गातील फ्लायवे नेटवर्क साईट आहे. याच मार्गाने परतत असताना.
      गेल्या आठवड्यात कॉमन पोचार्ड या परदेशी बदकांच्या थव्यातील एक पक्षी अडावद परिसरात कालव्या नजीक शेत परिसरात चंद्रकांत माळी यांना अस्वस्थ स्थितीत आढळला. त्यांनी तात्काळ वनकर्मचारी दशरथ पाटील यांच्याकडे तो सुपूर्द केला. वाइल्ड प्रकारातील बदकाला योग्य उपचार लाभून जीवदान मिळावे म्हणून त्यांनी चोपडा येथील त्यांचे पुतणे पक्षी अभ्यासक व संवर्धक हेमराज पाटील यांना तात्काळ फोन करून बोलावून घेतले. रात्री साडेनऊ वाजता अडावद येथे जाऊन हेमराज पाटील यांनी बदकाची पाहणी केली व ट्रान्सपोर्ट केजने सुरक्षितपणे घरी आणले. बदकाला कुठेही जखम नव्हती. खानदेशातील अचानक वाढलेल्या उष्णतेमुळे व बदकाच्या शरीरातील प्रथिने व ऊर्जा घटक कमी झाल्याने बदकाची उड्डान क्षमता कमी झाली होती, अशी माहिती पक्षी अभ्यासक हेमराज पाटील यांना दिली.
      त्यांनी व परिवारातील सदस्य पक्षी संवर्धक अश्विनी पाटील व आर्यदीप पाटील यांनी बदकास तीन दिवस पूरक सकस आहार तसेच आवश्यक औषधे प्रमाणात देऊन त्यास जीवदान दिले. स्वच्छतेसंबंधी काळजी घेतली. सतत तीन दिवस घरात मोठ्या ट्रीटमेंट पिंजऱ्यात बदकाला नैसर्गिक अधिवास सम अशी कृत्रिम जलाशय योजना केली होती. त्यातील पाणी वेळोवेळी बदलविले जात होते. बदकाची क्षमता व मुक्त हालचाली वाढल्या नंतर तिसऱ्या दिवशी योग्य अशा नैसर्गिक अधिवासात कॉमन पोचर्डला यशस्वीरित्या मुक्त करण्यात आले. तेथे दोन ते तीन दिवस मुक्काम करून हा बदक पुन्हा आपल्या मायदेशी 8000 पेक्षा जास्त किलोमीटरचे प्रदीर्घ अंतर कापत स्वगृही परतेल अशी माहिती मिळाली .पक्ष्याची वाहतूक करताना सदस्य जयेश बडगुजर व योगेश देवराज यांचे सहकार्य लाभले. यापूर्वी देखील सातपुडा निसर्ग संवर्धन संस्था संचलित सूर्योदय वन्य पशुपक्षी सेवालय द्वारा निशुल्क सेवा देत सत्तर पेक्षा अधिक पक्षी व दहा पेक्षा अधिक मुक्या प्राण्यांवर यशस्वी उपचार करून निसर्गात मुक्त करण्यात आले आहे.
     चोपडा तालुक्यात कुठेही पक्षी अथवा वन्यजीवसाठी निशुल्क मदत हवी असल्यास खालील क्रमांकावर संपर्क साधावा. पक्षी व वन्यजीव सहायता संपर्क क्रमांक -
9373804737 , 9922085434 
      @    कॉमन पोचार्ड बद्दल अधिक माहिती    @
    छोटी लालसरी किंवा चिमण शेन्द्र्या या पक्ष्यास इंग्रजी भाषेमध्ये Comman Pochard (Aythya ferina - शास्त्रीय नाव ) असे म्हणतात .तर मराठी मध्ये चिमण शेन्द्र्या आणि हिंदी मध्ये बुडार , बुडार नर , लाल सिर असे म्हणतात .
     हा पक्षी आकाराने बदकापेक्षा लहान पक्षी आहे . मिश्राहारी असून यामध्ये नर-मादी दिसायला वेगळे - वेगळे असतात.नराचे डोके आणि मान तांबडी असते आणि छाती व पाठीवरचा भाग काळा असतो .राहिलेला करड्या भागावर बारीक रेषा असतात .शेपटीचा खालचा आणि वरचा भाग काळ्या रंगाचा असतो .
     मादीचे डोके, मान ,पाठीवरचा भाग , छाती आणि शेपूट गडद तपकिरी रंगाचा असते. कंठ , चोचीजवळचा तोंडाचा भाग , डोळ्यांभोवतीचे कडे बदामी रंगाचे असतात .राहिलेला वरचा भाग राखाडी रंगाचा असतो व खालील भाग पिवळट करडा असतो .
     हा पक्षी पाकिस्तान ,भारतचा वायव्य भाग, बांगलादेश , आसाम आणि सभोवतालचे प्रांत व दक्षिणेकडे कर्नाटकपर्यंत आढळतो. हे पक्षी हिवाळ्यात आढळतात. त्यामुळे यांना हिवाळी पक्षी असे म्हणतात. हा पक्षी पॅलिआर्क्टिक प्रदेशात व युरेशियात वास्तव्य करतो . हा पक्षी झिलानी आणि सरोवरात राहणे पसंत करतो.
         खालील नकाशा व रंगछटांच्या आधारे या पक्ष्याचे विणीचे ठिकाण, निवासस्थान व हिवाळ्यात स्थलांतरित झाल्यानंतर हंगामी मुक्कामाचे ठिकाण समजून घेता येईल.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp