समाजाच्या विकासासाठी सकारात्मकता महत्त्वाची भास्कर रामचंद्रजी पालिवाल यांचे प्रतिपादन .... - S Maharastra 7 News

S Maharastra 7  News

✍️ मुख्य संपादक :- राजेंद्र पाटील

S Maharashtra 7 News

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Post Top Ad

Responsive Ads Here

03/03/2022

समाजाच्या विकासासाठी सकारात्मकता महत्त्वाची भास्कर रामचंद्रजी पालिवाल यांचे प्रतिपादन ....

नाशिक (प्रतिनिधी) :--
   समाजाच्या विकासासाठी सकारात्मकता महत्त्वाची भास्कर रामचंद्रजी पालिवाल यांचे प्रतिपादन  ....
   समाजाच्या प्रगतीसाठी आणि विकासासाठी आपल्यातील सकारात्मकता खूप महत्त्वाची आहे. ती नेहमी जवळ बाळगल्यास समाज विकास होतो, असे प्रतिपादन भास्कर रामचंद्रजी पालीवाल यांनी केले. नाशिक येथील पालीवाल महाजन समाजातर्फे ११ फेब्रुवारी रोजी शुक्रवारी स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते, या स्नेहसंमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून भास्कर रामचंद्रजी पालीवाल बोलत होते.
     याप्रसंगी भास्कर रामचंद्रजी पालीवाल पुढे म्हणाले की, आपला पालीवाल महाजन समाज जरी कमी प्रमाणात असला तरी खूप कष्टाळू आहे. आपल्या मेहनतीच्या जोरावर प्रत्येक व्यवसायात पालीवाल समाजातील बांधवांनी आपले नाव नाशिकमध्ये कमविले आहे. समाजबांधवांना सदैव एकमेकांसोबत राहण्याचे त्यांनी आवाहन केले. संकटकाळी आपल्या समाज बांधवांना मदत करण्यासाठी तत्पर रहा, असेही ते म्हणाले. 
    व्यासपीठावर रतनशेठ रामचंद्रजी पालीवाल, भास्कर रामचंद्रजी पालीवाल, चंद्रकांत त्रिभुवनदासजी पालीवाल, अशोक रामचंद्रजी पालीवाल, कैलाशचन्द्र फकिरचंद्रजी पालीवाल, विजयाताई वसंतजी पालीवाल आणि सुधीर द्वारकादासजी पालीवाल उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदनेने करण्यात आली. या वेळी मान्यवरांनी पालीवाल महाजन समाजाची कुलदेवता आशापूर्णा मातेच्या प्रतिमेला माल्यार्पण केले, यानंतर दीपप्रज्वलन करण्यात आले. या वेळी कैलाशचन्‍द्र पालीवाल, अशोक पालीवाल आणि सुधीर पालीवाल यांनी आपले मनोगत व्यक्त केले. 
       #  बालगोपालांनी केले कलागुणांचे प्रदर्शन   #
    या स्नेहसंमेलनात लहानग्यांसाठी आणि महिला वर्गासाठी संगीत खुर्चीचे आयोजन करण्यात आले होते. तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन केले होते. या कार्यक्रमात बालगोपालांसह मोठ्यांनीही आपल्या कलागुणांचे प्रदर्शन केले. 
      #  समाजातील ज्येष्ठांचा यथोचित सन्मान   #
    व्यासपीठावरील उपस्थित ज्येष्ठांना नाशिक पालीवाल महाजन समाजातर्फे शाल, श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. पालीवाल महाजन समाजातील अनेक मान्यवरांनाही गौरविण्यात आले. कार्यक्रमात आलेल्या समाजबांधवांनी आपल्या कुटुंबीयांचा परिचय करून दिला. यानंतर स्पर्धांचे मान्यवरांच्या हस्ते बक्षिस वितरण पार पडले. महिला वर्गानेदेखील या कार्यक्रमात आपले भरीव योगदान दिले. 
   कार्यक्रमाच्या शेवटी समारोप करताना आयोजक तुषार भास्कर पालीवाल यांनी स्नेहसंमेलनामागची संकल्पना सविस्तरपणे मांडली. तसेच आगामी वर्षभरात पालीवाल महाजन समाज नाशिकतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी सर्व समाजबांधवांनी एकत्र यावे असे आवाहन केले. लवकरच नाशिक पालीवाल महाजन समाजाची पंचकमिटी तथा कार्यकारिणी जाहीर करण्याचेही त्यांनी सांगितले.
    कार्यक्रम संयोजनासाठी दीपक वसंत पालीवाल, प्रमोद अशोक पालीवाल, गिरीश वसंत पालीवाल, धीरज शांतीलाल पालीवाल, आशिष कांतीलाल पालीवाल, अतुल कांतीलाल पालीवाल, अंकित नंदलाल पालीवाल, स्वप्नील अरुण पालीवाल आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयश्री धीरज पालीवाल आणि स्मिता कैलाशचंद्र पालीवाल यांनी केले. स्पर्धांचे सूत्रसंचालन यशिका तुषार पालीवाल आणि स्नेहा दीपक पालीवाल यांनी केले. संमेलनास सर्वश्री कांतीलाल रतनचंद्र पालीवाल, शांतीलाल रतनचंद्र पालीवाल, नंदलाल रतनचंद्र पालीवाल, मधुकर रतनचंद्र पालीवाल, अरुण रतनचंद्र पालीवाल, गोपाल अनिलकुमार पालीवाल, उमेश संतोषकुमार पालीवाल, अक्षय प्रेमकुमार पालीवाल, अभिजित सुधीर पालीवाल, शुभम सुनील पालीवाल आदींसह समाजबांधव महिलावर्ग, बालगोपाल उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी समाजबांधवांनी सहभोजनाचा आनंद घेतला. कार्यक्रमात करोना नियमावलीचे पालन करण्यात आले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज