मोठे वाघोदा येथील कमलाकर माळी या युवकाने वाढदिवसादिनी स्वखर्चाने ग्रामस्थांना दिली अनोखी वाचनकट्टाची भेट ... माणुसकी समुहाच्या माध्यमातुन स्तुत्य उपक्रम ... - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

01/04/2022

मोठे वाघोदा येथील कमलाकर माळी या युवकाने वाढदिवसादिनी स्वखर्चाने ग्रामस्थांना दिली अनोखी वाचनकट्टाची भेट ... माणुसकी समुहाच्या माध्यमातुन स्तुत्य उपक्रम ...

रावेर (प्रतिनिधी) :--
   मोठे वाघोदा येथील कमलाकर माळी या युवकाने वाढदिवसादिनी स्वखर्चाने ग्रामस्थांना दिली अनोखी वाचनकट्टाची भेट ...
   माणुसकी समुहाच्या माध्यमातुन स्तुत्य उपक्रम... 
      रावेर तालुक्यातील मोठे वाघोदा येथील सतत सामाजीक कार्यात अग्रेसर असलेले पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते कमलाकर माळी हे दरवर्षी त्यांच्या वाढदिवसानिमित्त नवीन नवीन उपक्रम राबवत असतात पण या वर्षी त्यांनी ग्रामस्थांना एक अनोखी भेट दिली आहे. स्वखर्चाने त्यांनी बसस्थानक परीसरात वडाच्या झाडाखाली बैठकी ओट्यावर वाघोदेकर सार्वजनिक वाचन कट्टयाची सोय ग्रामस्थांना करुन दिली आहे ग्रामस्थांना व गावातील तरुण मुलांना वाचनाची सवय लागावी यासाठी त्यांनी स्वखर्चाने हा समाजपोयोगी उपक्रम राबवला आहे.
     आतापर्यंत त्यांनी ग्राम स्वच्छता अभियान मोफत मोतीबिंदू शिबीर व्याख्यान रक्तदान शिबीर असे विविध उपक्रम राबवले आहेत आणी यावर्षी माणुसकी समुहाच्या माध्यमातुन सार्वजानिक वाचन कट्ट्याची सोय करुन दिली आहे त्यात काही वाचनीय पुस्तके तसेच दररोज वर्षभर वृत्तपत्र टाकण्याचे काम कमलाकर माळी यांच्यातर्फे करण्यात येणार आहे गावात भरपूर ग्रामस्थांना वाचनाची सवय आहे पण काही ना काही अभावी प्रत्येक जण पेपर खरेदी करु शकत नाही व सर्व समाज एका ठिकाणी येईल यासाठी हा प्रयत्न कमलाकर माळी यांनी केला आहे अशा या सामाजिक कार्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातुन कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp