मुख्याध्यापक विलास पाटील यांनी उभारली ग्रंथगुढी... - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

02/04/2022

मुख्याध्यापक विलास पाटील यांनी उभारली ग्रंथगुढी...

चोपडा (प्रतिनिधी) :--
     मुख्याध्यापक विलास पाटील यांनी उभारली ग्रंथगुढी...
       २ एप्रिल २०२२ हिंदू नववर्ष- शालिवाहन शके१९४४ शुभकृत संवत्सरारंभ... चैत्री नवरात्रारंभ.. अर्थात गुढी पाडवा.. मराठी नूतन वर्षारंभ. चैत्रपाडवा -प्रत्येक दारात चैत्राची रांगोळी सजली. आनंदाने निसर्गाच्या गुढया ऊभारत नवचैतन्याची बिजं पेरणाऱ्या.. विलयाला पायाखाली ठेवून चैत्रपालवीद्वारे ओसंडून वाहतांना जन्माइतका मृत्यूही सहज असतो याचा लोभसवाणं आनंददायी प्रत्यय देणारा महिना म्हणजे चैत्र.. खऱ्याखुऱ्या आनंदाचे प्रतीक म्हणून ज्याच्या कडे मोठेपणाचा मान येतो... तो हा चैत्र महिना.. त्याचा चैत्र पाडवा आनंदाच्या गुढया उभारत सर्वत्र साजरा होतो.. हाच चैत्रपाडवा जय श्री दादाजी हायस्कूल तांदळवाडीचे मुख्याध्यापक व म.सा.प. पुणे शाखा चोपडाचे कार्याध्यक्ष विलास पाटील यांनी आजच्या पिढीचे भावी प्रतिनिधी असलेल्या नातवंडासमोर पुस्तकांची / ग्रंथाची अभिनव गुढी उभारून साजरा केला. कारण मानवी मन व बुद्धी सुपिक करण्याचे साधन.. आयुष्यभराची शिदोरी म्हणजे ग्रंथ होय. तेव्हा आजच्या भावी पिढीने जीवनातील उंच ध्येय शिखरे पार करायची असतील तर त्यांनी पुस्तक ग्रंथ वाचनाची कास धरावी ,या ज्ञानगुढीचे जतन करावे अशा भावनेतून कल्पकतेने त्यांच्यासमोर संत साहित्य -अध्यात्मिक साहित्य तसेच विविध प्रकारच्या ज्ञानग्रंथाची अभिनव गुढी उभारत गुढीपाडवा साजरा केला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp