चोपडा वनक्षेत्र कार्यालय येथे वनमजूरांना वनसंरक्षण किट वाटप . . .
चोपडा वनक्षेत्र कार्यालय येथे वनमजूर यांना वनसंरक्षण किट वाटप करण्यात आले. यावल वनविभाग , जळगाव विभागात मा. पवार वनसंरक्षक धुळे (प्रा.) यांच्या मार्गदर्शनाने तसेच मा. जमीर शेख उपवनसंरक्षक यावल व वनविभाग जळगाव यांच्या संकल्पनेतून श्री.पी व्ही. हाडपे सहा. वनसंरक्षक , चोपडा यांच्या प्रयत्नाने वनसंरक्षण उपयोगी असलेले साहीत्य - दुर्बीण , कापडी तंबू , जीपीएस यंत्र, बैटरी, वनउपज तपासणी नाक्यावरील बॅरीगेटस , अवैध अतिक्रमण व अवैध वृक्षतोड नियंत्रण करण्याची कार्यवाही करीता वन कर्मचारी स्वसंरक्षणासाठी शिल्ड , हेल्मेट , चेस्ट गार्ड , इत्यादी साहीत्य वाटप करण्यात आले.
जंगलातील नैसर्गिक संसाधनांचा शाश्वत उपयोग करणे , त्यांची उत्पादकता वाढविणे, वनमजूरांना जंगलाचे महत्व समजावून गावकऱ्यांची निर्भरता कमी करणे , पर्यायी रोजगार उपलब्ध करुन देणे व गावकऱ्यांच्या सहभागातून वन आणि वन्यजीवांचे संरक्षण तसेच वन व्यवस्थापनाचा दर्जा उंचावणे.
यावेळी मा. कृषिकेश रावले साहब उपविभागीय पोलीस अधिकारी , चोपडा, व मा. पी.व्ही. हाडपे सहा. वनसंरक्षक यांच्या हस्ते वनक्षेत्र निहाय साहित्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमा दरम्यान वनाधिकाऱ्यांनी वनसंरक्षणा बाबत मार्गदर्शन केले. यावेळी वनपरीक्षेत्राचे वनधिकारी चोपडा , वैजापुर, देवझिरी , अडावद यांच्या सह वनपाल , वनरक्षक व इतर कर्मचारी उपस्थित होते.

No comments:
Post a Comment