राजर्षी शाहूजींचे नाव काळाच्या कपाळावर कोरले गेले आहे - प्रा. संदीप पाटील - S Maharastra 7 News

S Maharastra 7  News

✍️ मुख्य संपादक :- राजेंद्र पाटील

S Maharashtra 7 News

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Post Top Ad

Responsive Ads Here

07/05/2023

राजर्षी शाहूजींचे नाव काळाच्या कपाळावर कोरले गेले आहे - प्रा. संदीप पाटील

चोपडा (प्रतिनिधी) : - -
          राजर्षी शाहूजींचे नाव काळाच्या कपाळावर कोरले गेले आहे - प्रा. संदीप पाटील
         राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे वाणी व कृतीने लोकोत्तर कार्य करणारे राजे होते. या देशात समताधिष्ठित समाज व्यवस्था निर्माण करण्यासाठी त्यांनी सर्वांपर्यंत शिक्षण पोचविण्याचे कार्य आरंभिले असल्याने भारतातील इतर अनेक राजे व संस्थानिकांमध्ये त्यांनी आपले वेगळे पण निर्माण केले असल्यानेच त्यांचे नाव काळाच्या कपाळावर कोरले गेले असल्याचे मत प्रा.संदीप भास्कर पाटील यांनी व्यक्त केले.
          महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयात राजर्षी शाहू महाराज स्मृती शताब्दी समारोप निमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलतांना प्रा. पाटील म्हणाले की, राजर्षी शाहू महाराज यांचे विचार आणि कार्य यातून बोध घेऊन, आगामी काळात वाटचाल करणे, हीच त्यांना खरी आदरांजली असणार आहे. त्या मुळे लोकविरोधाला नजुमानता, महापुरुषांच्या विचारांचे अनुसरण करून, कार्यकरीत राहावे. असे त्यांनी उपस्थितांना आवाहन केले. तत्पूर्वी उपप्राचार्य प्रा. बी. एस. हळपे यांच्या हस्ते राजर्षी शाहूंच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले.
          कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षक प्रा. एस. पी. पाटील यांनी केले तर अध्यक्षीय भाषण उपप्राचार्य प्रा. बी. एस. हळपे यांनी केले. कार्यक्रमाला समन्वयक प्रा. ए. एन. बोरसे, प्रा. पी. एस. पाडवी यांच्या सह सर्व प्राध्यापक बंधू भगिनी उपस्थित होते.
      कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.भूषण पाटील यांनी केले तर, आभार प्रा.एन.बी.शिरसाठ यांनी मानलेत. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.निवृत्ती पाटील व श्री.राकेश काविरे यांनी परिश्रम घेतलेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज