ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

15/06/2023

ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत

चोपडा (प्रतिनिधी) : - -
       ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत
          चोपडा येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये शाळेच्या पहिल्या दिवसाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांचे ढोल ताशांच्या गजरात तिलक पूजन करून जल्लोषात स्वागत करण्यात आले. शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारापासून विद्यार्थ्यांसाठी पायघड्या टाकण्यात आल्या. फुले, फुगे, पताका आणि रांगोळ्यांनी शाळेचा सर्व परिसर सजविण्यात आला. आकर्षक रांगोळीने सजावट करून विद्यार्थ्यांसाठी प्रसन्न वातावरणाची निर्मिती करण्यात आली.
           याप्रसंगी विद्यार्थ्यांना चॉकलेटचे वाटप करण्यात आले. 'शाळेतील माझा पहिला दिवस' असा संदेश असणारा सेल्फी पॉईंट पूर्व प्राथमिक गटातील विद्यार्थ्यांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. प्राण्यांची अनोखी वेशभूषा परिधान करून प्राथमिक गटातील विद्यार्थ्यांनी प्रथमच शाळेत पाऊल टाकणाऱ्या विद्यार्थ्यांचे अनोख्या पद्धतीने स्वागत केले. 
         याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका ममता कपिल न्याती आणि  शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp