अरेरावीची भाषा केली हे सिद्ध करून दाखवा अन्यथा विरोधकांची माफी मागा... शहराच्या नाही तर वैयक्तिक विकासाला विरोध.... - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

15/07/2026

अरेरावीची भाषा केली हे सिद्ध करून दाखवा अन्यथा विरोधकांची माफी मागा... शहराच्या नाही तर वैयक्तिक विकासाला विरोध....

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

        अरेरावीची भाषा केली हे सिद्ध करून दाखवा अन्यथा विरोधकांची माफी मागा... शहराच्या नाही तर वैयक्तिक विकासाला विरोध....

        यापुढील नगरपालिकेच्या सभेचे ऑनलाईन streaming किंवा व्हिडिओ चित्रीकरण व्हावे, नगरीक व पत्रकार यांच्या उपस्थितीत सभा द्यावी विरोधकांची पत्रकार परिषधेत मागणी....

         चोपडा नगरपरिषद सर्वसाधारण सभा 10 जुलै 2026 मध्ये सत्ताधाऱ्यांनी आमच्याकडे बहुमत आहे व सर्व विषय बहुमताने मंजूर असं म्हणत एकाही विषयावर चर्चा होऊ दिली नाही, मागील सभेचे इतिवृत्त वाचले नाही, तसेच या सभेचे विषय देखील वाचू दिले नाहीत, त्यावर आम्ही विरोधी पक्षाने विषय वाचन करण्याची मागणी लावून धरली असता. त्यात सत्ताधारी हे सभा सोडून निघून गेले. नगराध्यक्षा यांनी पिठासीन अध्यक्ष म्हणून कुठलाही निर्णय दिला नाही व सभा सरळ समाप्त केली. या असल्या चुका असताना विरोधकांनाच आरोपी म्हणणं अत्यंत चुकीचे आहे.

       स्थायी सभेच्या विषयांना विरोध का केला 

        नगराध्यक्षा म्हटल्या की 6 जुलै च्या स्थायी सभेच्या विरोधकांनी विषयांना विरोध दर्शवला आहे. पण विरोध का दर्शवला याची करणे सांगतली नाहीत. या सभेमध्ये नगरपालिकेच्या सर्व विभागांच्या वार्षिक कंत्राटांच्या निविदांचे दर मंजुरीचे ठराव होते. दर मंजुरी सभेपुढे मांडताना त्याचे दर त्यात असणे अपेक्षित होते परंतु फक्त निविदाकाराच्या नावाचा उल्लेख होता कोणी किती दर भरले याचे स्पष्टताच नाही. ऑनलाइन टेंडर चेक केला असता कोणी किती दर भरले ते प्रसिद्ध केलेले नाही. तर मग यात कसली पारदर्शकता. यात यांचा वैयक्तिक विकास वैयक्तिक मॅनेज टेंडर दिसतात. जनतेचा विश्वासघात यांच्याकडून होत आहे. आणि हे टेंडर मॅनेज करण्यातच बराच वेळ गेला असावा म्हणून पुढील सभा 100 दिवसात गेली काय?आचारसंहितेचे फक्त निमित्त होतं.

        दुसरा मुद्दा या सर्वसाधारण सभेत विकास कामे, कर्मचाऱ्यांची मेडिकल बीलं, जमीन आरक्षण बाबतचे ठराव, सर्वात महत्त्वाचा म्हणजे चतुर्थ पंचवार्षिक करवाढ म्हणजे प्रत्येकाच्या घरपट्टीत पंचवीस टक्के वाढीचा ठराव ठेवला होता. असल्या गंभीर विषयावर चर्चा देखील सभागृहाने केली नाही. कर जनतेचा वाढणार आहे. सत्ताधाऱ्यांना काय घेणं देणं त्याच्याशी. हे आम्ही जनतेला स्पष्ट करू इच्छितो.

        सत्ताधारी पक्षाला जर खरच विकास करायचा आहे तर सभेच्या वेळी विषय वाचायला त्यावर चर्चा करायला घाबरता का आहेत ? नगराध्यक्षा यांनी सभा कामकाजाबाबतचे नियम पडताळून घ्यावेत. जनतेच्या हिताचे विषय असतील तर ते वाचून दाखवावे लागतात त्यावर साधक बाधक चर्चा होणे अपेक्षित असते. काही ठराव मागेही घेतले जाऊ शकतात काहींमध्ये बदलही होऊ शकतो. याला सभा म्हणतात. नाहीतर कागदावरच मीटिंग घ्याव्यात असे यांचे विचार आहेत असं वाटते. आम्ही नगराध्यक्ष आवाहन करतो यापुढे सर्वसाधारण सभेत शहरातील प्रतिष्ठित व्यक्ती पत्रकार तसेच कॅमेरामन यांना उपस्थित ठेवावे व ऑन कॅमेरा मीटिंग घ्यावी. एवढेच जर जनतेच्या विकासाचे गप्पा मारत असाल तर जनतेला समजू द्या तुम्ही जनतेच्या विकासाचे नेमके कोणते विषय या सभेत पास करतात.

         विरोधकांनी नगराध्यक्षांना अरेरावीची भाषा केली असा आरोप लावला आहे. हा आरोप गंभीर स्वरूपाचा असून सभेचे रिकॉर्डिंग सुद्धा उपलब्ध आहे त्यात कोणी अरेरावीची भाषा केली हे सिद्ध करून दाखवा व अन्यथा विरोधकांची माफी मागावी. अशी विरोधीपक्ष सदस्यांची पत्रकार परिषधेत मागणी 

           नगराध्यक्षांनी रबर स्टॅम्प बनवू नये 

          नगराध्यक्षांच्या समोर सर्व सुरू असताना त्यांनी हा निर्णय देणे अपेक्षित होतो की सभा कामकाज हे नियमा नुसार चालेल विषयांचे वाचन होईल. पण नगराध्यक्षाच दहा मिनिटात सभा समाप्त करून निघून गेल्या. आणि नंतर चार दिवसांनी अरेरावीची भाषा असा आरोप लावत आहेत. त्या क्षणी एखाद्या सदस्यांनी अरेरावीची भाषा केली असती तर त्या क्षणी विचारलं असतंना. परंतु हे नंतर कोणी त्यांना शिकवलं आहे का ? आणि मग त्या बोलत आहेत का ? असं वाटतं की त्या रबर स्टॅम्प नगराध्यक्ष बनत आहेत त्यांना कोणीतरी सांगत आणि मग ते नंतर प्रतिक्रिया देतात ही खेदाची बाब आहे. नगराध्यक्षा यांनी स्वतःच्या विवेकाने निर्णय घ्यावेत. तसेच नगरपालिकेच्या दैनंदिन कामाला विकास काम म्हणणे बंद करावे. नगरपरिषद ही नगरपरिषद अधिनियम 1965 नुसार चालते. प्रत्येक छोट्या गोष्टीत चमकोगिरी करून नाही चालत.

       नगराध्यक्षांनी महिला कार्ड खेळणं बंद करावे 

       मागील सभेत स्वतःसाठी केबिनचा खर्च करणे, आपल्या वैयक्तिक वाहनासाठी ड्रायव्हर व इंधनासाठी दर महिन्याला रोखीने 25000 चे बिल काढणे तेही स्वतःच्या नावावर, तेही जनतेच्या कराच्या पैशातून? हे मुद्दे उचलल्यावर मी महिला व उच्चशिक्षित महिला असल्याने माझ्यावर आरोप करत आहेत असं वक्तव्य करणे हे अत्यंत चुकीचे आहे. वैयक्तिक फायदा करून घेणं यात कुठले जनतेचे विकासकाम? आणि स्वतःच स्वतःला उच्चशिक्षित म्हणून घेणारे पद व सत्ता मिळतात स्वतःचा फायदा पहिले बघतात या गोष्टीच जास्त दुर्दैव वाटतं. वैयक्तिक इंधन व चालक खर्च, निविदांचे दर न दिसणे या बाबत विरोधकांनी सवाल उचलले तर महिलांचा अपमान म्हणून आरोप करायचा यापुढे नगर परिषद अधिकारी कर्मचारी तसेच जनतेतले लोक नगराध्यक्ष यांच्याशी समस्या मांडायला गेले तर त्यांच्यावरही असा आरोप होण्याची शक्यता नाकारता येत नाही. काल जिल्हाधिकारी यांना ह्या संदर्भात निवेदन देण्यात आले. असे विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp