विरोधी पक्षनेते अजितदादा पवार येत्या अधिवेशनात मांडणार आदिवासी कोळी जमातीचा प्रश्न... - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

17/06/2023

विरोधी पक्षनेते अजितदादा पवार येत्या अधिवेशनात मांडणार आदिवासी कोळी जमातीचा प्रश्न...

चोपडा (प्रतिनिधी) : - -
         विरोधी पक्षनेते अजितदादा पवार येत्या अधिवेशनात मांडणार आदिवासी कोळी जमातीचा प्रश्न.. 
          अमळनेर  दौऱ्यावर आलेले विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांच्याशी कोळी समाज शिष्टमंडळाने भेट घेत आदिवासी कोळी समाजावर होत असलेल्या अन्यायाची माहिती देऊन  निवेदन दिले असता कोळी समाजाला न्याय मिळवून देण्याचे आश्वासन  त्यांनी दिले.शिवाय येत्या अधिवेशनात हा प्रश्न मांडू आणि मुख्यमंत्री  व आदिवासी विकास विभागाचे आयुक्त, सचिव यांचेसमवेत बैठक लावून देऊन चर्चा घडवून आणणार  असल्याचे सांगितले. काल प्रांत कार्यालयावर आदिवासी टोकरे कोळी जमातीचे बांधवांचे संविधानिक न्याय हक्क मागण्याकरिता शेकडोच्या संख्येने आंदोलन होते मात्र प्रांताधिकारी  हे शरदचंद्रजी पवार साहेब, अजितदादा पवार व जयंतराव पाटील यांचा दौरा असल्याकारणाने कार्यालयात हजर राहू शकले नसल्या कारणाने आदिवासी टोकरे कोळी जमातीचे शिष्टमंडळाने अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नाट्यगृहात असलेल्या शिबिरात भेट घेतली. व तेथेच आदिवासी टोकरे, महादेव, मल्हार कोळी जमातीतर्फे निवेदन देण्यात आले.
          त्यानंतर  अजितदादांनी प्रांत साहेबांना बोलावून आदिवासी  कोळी जमातीच्या जाती दाखल्याच्या विषयावर चर्चा करून योग्य ते सहकार्य करण्याच्या सूचना केल्या. त्याचप्रमाणे सदर विषय मुख्यमंत्री यांना कळवून आदिवासी विकास विभागाचे आयुक्त, सचिव यांचेसमवेत बैठक लावून देण्याचे आश्वासित करून येत्या जुलै महिन्यात होणाऱ्या अधिवेशनात विरोधी पक्ष नेते म्हणून बाजू मांडणार असल्याची भूमिका स्पष्ट केली. 
          ही चर्चा घडवून आणण्यासाठी माजी विधानसभा अध्यक्ष श्री.अरुणभाई गुजराथी, माजी आ. श्री.कैलास बापू पाटील, चो.सा.का.चेअरमन श्री. चंद्रहास भाई गुजराथी, कृ. उ. बा. समिती संचालक श्री. घनश्याम पाटील, अमळनेर तालुक्याचे आमदार श्री.अनिल भाईदास पाटील , श्री. सुनील पाटील, श्री. डी. पी. साळुंके , राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष श्री.दीपक सोनवणे, श्री. तुकाराम पाटील , श्री.राजू भाटिया यांचे सहकार्य लाभले.
          आदिवासी टोकरे कोळी जमातीच्या वतीने अॕड.गणेश सोनवणे, श्री.शुभम सोनवणे, श्री. नामदेव येळवे यांच्या समवेत चोपडा व अमळनेर तालुक्यातील कोळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp