चोपडा महाविद्यालयात ' महाराजस्व अभियान ' व ' मतदान जागृती अभियान ' कार्यक्रमाचे आयोजन - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

28/07/2023

चोपडा महाविद्यालयात ' महाराजस्व अभियान ' व ' मतदान जागृती अभियान ' कार्यक्रमाचे आयोजन

चोपडा (प्रतिनिधी) : - -
           चोपडा महाविद्यालयात ' महाराजस्व अभियान ' व ' मतदान जागृती अभियान ' कार्यक्रमाचे आयोजन
           चोपडा येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे डॉ.सुरेश जी. पाटील महाविद्यालय तसेच महसूल, वन विभाग व तहसील कार्यालय, चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने 'महाराजस्व अभियान' व 'मतदान जागृती अभियान' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
           या कार्यक्रमाचे प्रास्ताविक चोपडा तालुक्याचे शेतकरी नेते एस.बी. (नाना) पाटील यांनी केले. यावेळी त्यांनी शेतकऱ्याच्या मुलांना जागृत राहण्याचा सल्ला दिला. तसेच ई- पीक पाहणी व सन्मान निधी योजनेसाठी अर्ज करण्यासासंदर्भात माहिती दिली.
          या कार्यक्रमाच्या माध्यमातून तरुणांमध्ये ई- पिक पाहणी व पी. एम. किसान सन्मान निधी  योजना त्याचप्रमाणे मतदानाविषयी जनजागृती इत्यादी विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. 
          तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी मतदानाविषयी जागृती व्हावी संदर्भात विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले. त्यानंतर चोपडा कृषी अधिकारी दीपक साळुंखे  यांनी पीएम किसान सन्माननिधी ॲपबद्दल उपस्थितांना माहिती दिली व ई- पीक पाहणी करून स्वतःचा पीक पेरा शेतकरी स्वतः कसा उताऱ्यावर लावू शकतो याबद्दल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमा प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. ए. सूर्यवंशी यांनी  मार्गदर्शन करतांना महाविद्यालयाचा चढता आलेख व प्रगती यासंदर्भात मार्गदर्शन केले. 
           यावेळी संस्थेचे अध्यक्ष ऍड. संदीप सुरेश पाटील यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, आपण आपल्या पालकांना व गावातील सर्व शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी तसेच पीएम किसान सन्माननिधी योजना या ॲप्सची माहिती देऊन जनजागृती करावी तसेच जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत ही योजना कशी पोचविता येईल व सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा कसा लाभ घेता येईल या संदर्भात मार्गदर्शन केले. यावेळी सर्वांनी फॉर्म भरून या योजनेत सहभागी होण्यास आणि आपले सामाजिक दायित्व पूर्ण करण्याचे आवाहन केले.
           या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. के. एन. सोनवणे यांनी केले तर आभार जी. बी. बडगुजर यांनी मानले. या कार्यक्रमा प्रसंगी महाविद्यालयात बहुसंख्य विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी बंधू - भगिनी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp