स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयातील युवती सभेचा उद्‌घाटन प्रसंगी ; उत्तम आहार व निरोगी आरोग्य हीच यशाची गुरुकिल्ली - डॉ.लिनेश्वरी बोरोले. - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

07/08/2023

स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयातील युवती सभेचा उद्‌घाटन प्रसंगी ; उत्तम आहार व निरोगी आरोग्य हीच यशाची गुरुकिल्ली - डॉ.लिनेश्वरी बोरोले.

जळगाव (प्रतिनिधी) : - -
          स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयातील युवती सभेचा उद्‌घाटन प्रसंगी ; उत्तम आहार व निरोगी आरोग्य हीच यशाची गुरुकिल्ली - डॉ.लिनेश्वरी बोरोले.
           जळगाव येथील के.सी.ई. सोसायटीच्या मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालयाचे स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात सोमवार दि. 7 ऑगस्ट 2023 रोजी युवती सभा मंडळाचे उद्‌घाटन शहरातील नामांकीत अँक्युपंचर तज्ञ डॉ. सौ. लिनेश्वरी हर्षल बोरोले यांच्या शुभहस्ते झाले.
         याप्रसंगी त्यांचा भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन सन्मानीत करण्यात आले. यावेळी कनिष्ठ महाविद्यालयीन युवतींशी आहार आणि आरोग्य संबधित अनेक महत्वपूर्ण बाबींवर डॉ. सौ. लिनेश्वरी बोरोले यांनी हितगुज साधताना जीवनात ॲक्युपंचरचे महत्व विषद करताना, त्यांना उत्तम आरोग्यासाठी संतुलित आहाराचे महत्त्व पटवून देत युवतींच्या आरोग्यविषयक विविध समस्या जाणून घेऊन त्यांच्या अनेक प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देत समर्पक मार्गदर्शन केले. यावेळी कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्य श्रीमती.के.जी. सपकाळे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या.
           कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी पर्यवेक्षक प्रा. श्री.आर.बी.ठाकरे, समन्वयक प्रा.सौ.स्वाती बऱ्हाटे उपस्थित होते. युवती समितीच्या अध्यक्षा प्रा.सौ. धनश्री पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक, प्रा.सौ. किरण महाजन यांनी सूत्रसंचालन तर प्रा.सौ.रुपम निळे यांनी आभार प्रदर्शन केले. यावेळी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
          कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समिती सदस्या प्रा.सौ.छाया चौधरी, प्रा.सौ. राजश्री महाजन, प्रा. सौ. शिल्पा सरोदे, प्रा.सौ.वर्षा पाटील, प्रा. श्रीमती प्रज्ञा पाटील, प्रा. सौ. पल्लवी फिरके, प्रा. श्रीमती कविता भारुळे, प्रा. श्रीमती कांचन चौधरी, प्रा. श्रीमती पुजा सायखेडे, प्रा. सौ. छाया पाटील यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp