Post Top Ad
Responsive Ads Here
30/10/2023
Home
Unlabelled
दुसऱ्या जाती धर्माच्या लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जातील अशा प्रकारचे आक्षेपार्ह फोटो व्हिडीओ व्हाट्स अँप वर स्टेटस म्हणून ठेवू नये किंवा ते सोशल मीडिया वर व्हायरल करू नये - - पो. नि. के. के. पाटील
दुसऱ्या जाती धर्माच्या लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जातील अशा प्रकारचे आक्षेपार्ह फोटो व्हिडीओ व्हाट्स अँप वर स्टेटस म्हणून ठेवू नये किंवा ते सोशल मीडिया वर व्हायरल करू नये - - पो. नि. के. के. पाटील
चोपडा शहर पो स्टे च्या वतीने चोपडा शहर व तालुक्यातील सर्व जाती धर्माच्या नागरिकांना, सर्व विद्यार्थी व इतरांना देखील अवाहन करण्यात येते कि कोणीही दुसऱ्या जाती धर्माच्या लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जातील अशा प्रकारचे आक्षेपार्ह फोटो व्हिडीओ व्हाट्स अँप वर स्टेटस म्हणून ठेवू नये किंवा ते इंस्टाग्राम, फेसबुक व इतर सोशल मीडिया वर व्हायरल करू नये किंवा लाईक करू नये अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्या आरोपी विरुद्ध या एका महिन्यात 4 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत तसेच पोलिसांच्या वतीने सोशल मीडियावर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे.
तरी भविष्यात देखील अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्या लोकांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार आहे त्यामुळे दोन भिन्न जाती धर्मा मध्ये तेढ निर्माण होईल व सार्वजनिक शांततेचा भंग होईल अशा प्रकारचे गैर कृत्य कोणीही करू नये अन्यथा आपणास कठोर कारवाईस सामोरे जावे लागेल आणी आपल्या अशा गैर व बेजाबदार कृत्या मुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास आपणास सर्वस्वी जबाबदार धरण्यात येईल याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी. असे आवाहन चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक के. के. पाटील यांनी केले आहे.
Share This
About ✍️ मुख्य संपादक : -- राजेंद्र पाटील
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post Bottom Ad
Responsive Ads Here




No comments:
Post a Comment