घडताना बिघडताना इयत्ता नववी दहावीच्या विद्यार्थी व पालकांसाठी चा उपक्रम विवेकानंद विद्यालयात यशस्वी - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

09/10/2023

घडताना बिघडताना इयत्ता नववी दहावीच्या विद्यार्थी व पालकांसाठी चा उपक्रम विवेकानंद विद्यालयात यशस्वी


चोपडा (प्रतिनिधी)
         घडताना बिघडताना इयत्ता नववी दहावीच्या विद्यार्थी व पालकांसाठी चा उपक्रम विवेकानंद विद्यालयात यशस्वी

           चोपडा येथील विवेकानंद विद्यालयात इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थी व पालकांसाठी नागोठाणे  येथील लेखक निवेदक व शैक्षणिक सामाजिक औद्योगिक क्षेत्रातील प्रेरक प्रशिक्षक निवृत्त इंजिनियर ज्येष्ठ रंगकर्मी मानसशास्त्र व शिक्षण शास्त्र याचे गाढे अभ्यासक संजय गोविलकर यांनी आयुष्य घडवणारा कार्यक्रम " घडताना बिघडताना " अतिशय सुंदर रित्या सादर करत विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शक केले.


          या उपक्रमात त्यांनी इयत्ता नववी दहावीत शिकणारा तुमचा मुलगा खरंच अभ्यास करतो का? अभ्यास म्हणजे काय करतो ? क्रमिक पुस्तक वाचतो समजून घेतो की गाईड पाठ करतो ?तुमच्या मुलाला भरपूर मार्क्स मिळवावेत असं  वाटते का ? दहावीला 90 / 95 टक्के मार्क्स मिळवणारा मुलगा बारावीत 70 / 75 टक्के पर्यंत का घसरतो . तुमचा मुलगा नुसता परीक्षेत नाही तर आयुष्यातही यशस्वी व्हावा असे तुम्हाला वाटते का? आताच्या काळात नुसतच परीक्षार्थी होऊन स्पर्धेला तोंड देता येणार आहे का ? आता आपल्या अभ्यास पद्धतीमध्ये काय बदल केला पाहिजे ? हे सगळं या उपक्रमातून व्यवस्थितपणे स्लाइट्स व रंजक व्हिडिओ च्या माध्यमातून दाखले व उदाहरण देत समजावून सांगत मार्गदर्शन  केले .

         कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती मातेच्या प्रतिमेची पूजनाने झाली . मार्गदर्शक वक्ते श्री .संजय गोविलकर यांचे स्वागत व सत्कार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर विकास हरताळकर यांनी केले. याप्रसंगी संस्थेचे सचिव अॅड. रवींद्र जैन , सहसचिव डॉक्टर विनीत हरताळकर , विश्वस्त व मुख्याध्यापक नरेंद्र भावे , प्राचार्य सुरेखा मिस्तरी, मुख्याध्यापिका आशा चित्ते मॅडम यांच्यासह विद्यालयातील इयत्ता नववी व दहावीचे सर्व विद्यार्थी व त्यांचे पालक, शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्तावना व पाहुण्यांचा परिचय  मुख्याध्यापक नरेंद्र भावे यांनी केला. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन पवनलाठी यांनी केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp