अजित पवारांवर टीका करणारे रोहित पवार महाराष्ट्र धर्म पाळा असे सांगतात ते चोपड्या तालुक्यात शेतकरी धर्म पाळतात का ? : - सुनिल पाटील - S Maharastra 7 News

S Maharastra 7  News

✍️ मुख्य संपादक :- राजेंद्र पाटील

S Maharashtra 7 News

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Post Top Ad

Responsive Ads Here

07/01/2024

अजित पवारांवर टीका करणारे रोहित पवार महाराष्ट्र धर्म पाळा असे सांगतात ते चोपड्या तालुक्यात शेतकरी धर्म पाळतात का ? : - सुनिल पाटील


 चोपडा (प्रतिनिधी) : - -

  अजित पवारांवर टीका करणारे रोहित पवार महाराष्ट्र धर्म पाळा असे सांगतात ते चोपड्या तालुक्यात शेतकरी धर्म पाळतात का ? : - सुनिल पाटील

         राष्ट्रवादी कॉग्रेस (अजित दादा गट) तर्फे आज त्यांच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली त्यावेळी बोलताना रोहित पवार आमचे नेते अजित पवार यांच्यावर टीका करतात. जे वडील व आजोबा यांच्या जीवावर राजकारण करतात त्यांनी अजित पवार सारख्या संपूर्ण महाराष्ट्राची जाण असणाऱ्या नेत्यावर बोलु नये.

         जे आमच्या नेत्याला महाराष्ट्र धर्म सांगतात त्यांनी चोपड्या तालुक्यात तरी महाराष्ट्र व शेतकरी धर्म पळाला हे का ? चोपडा साखर कारखाना त्यांच्या बारामती ऍग्रो कंपनी तर्फे भाडेतत्वावर घेतांना जो 12% व्याज आकारणीची जाचक अट टाकली आहे त्यामुळे कारखाना कर्ज मुक्त न होता अजुन कर्जाचा डोंगर उभा राहील व हा शेतकऱ्यांचा कारखाना डबघाईत जाईल. हा त्यांचा कारखाना गिळणकृत करण्याचा उद्देश आहे. त्यांनी चोपड्यातील शेतकऱ्यां समोर चर्चेस यावे तुमचा हा चोपडा सहकारी कारखाना गिळणकृत करण्याचा उद्देश आहे किंवा नाही असे खुले आवाहन दिले. मग आम्हाला महाराष्ट्र धर्म सांगावा असे अजित पवार यांचे जळगाव जिल्ह्यातील खंदे समर्थक सुनील पाटील यांनी पत्रकार परिषदेत बोलतांना सांगितले त्यावेळी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष विजय पाटील आणि मिलिंद सोनवणे हजर होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज