अरविंद केजरीवाल यांच्या अटकेचे चोपड्यात पडसाद , आपचे कार्यकर्ते आक्रमक.... - S Maharastra 7 News

S Maharastra 7  News

✍️ मुख्य संपादक :- राजेंद्र पाटील

S Maharashtra 7 News

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Post Top Ad

Responsive Ads Here

22/03/2024

अरविंद केजरीवाल यांच्या अटकेचे चोपड्यात पडसाद , आपचे कार्यकर्ते आक्रमक....


 चोपडा (प्रतिनिधी) : - -

          अरविंद केजरीवाल यांच्या अटकेचे चोपड्यात पडसाद , आपचे कार्यकर्ते आक्रमक....

         आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर राज्यभरात आपचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. चोपड्यातही शुक्रवारी दि. 22 त्याचे पडसाद उमटले.

        आप कार्यकर्त्यांनी नवीन तहसिल कार्यालय परिसरात अर्धा तास इडी व केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देत केंद्र सरकारचा निषेध नोंदविला. नही चलेगी -  नही चलेगी मोदीशाही नही चलेगी , ' जब जब मोदी डरता है - पुलीस को आगे करता है ' यांसारख्या  घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. कार्यकर्त्यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे परिसर दणाणून गेला होता.

         हिंमत असेल तर पोलिसांनी राज्यातील भ्रष्टाचारी नेत्यांना अटक करावी, असे आव्हान कार्यकर्त्यां कडून देण्यात आले. आपच्या कार्यकर्त्यांनी तहसिल कार्यालया समोर निदर्शने केली. यावेळी कार्यकर्त्यांनी आक्रमक होत घोषणाबाजी केली.

         तहसिलदार भाऊसाहेब थोरात यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देते वेळी आम आदमी पक्षाचे तालुका अध्यक्ष समाधान बाविस्कर , आर डी पाटील (जिल्हा उपाध्यक्ष) , इंजि. सुधीर पाटील (चोपडा शहराध्यक्ष) , मुकुंद पाटील (चोपडा तालुका उपाध्यक्ष) ,  बाळु कोळी (चोपडा तालुका महासचिव) , रामचंद्र भालेराव (चोपडा शहर सचिव) , मोहन सोनवणे , अशोक नाना पाटील, राहुल गंभीर पाटील , समाधान उत्तम कोळी (शाखा प्रमुख चहार्डी) आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज