श्री संत सावता माळी युवक संघांचे प्रदेशाध्यक्ष जितेंद्र महाजन यांचे महाज्योती कडून मिळणाऱ्या टॅब योजनेचा फॉर्म भरण्याचे आवाहन..... - S Maharastra 7 News

S Maharastra 7  News

✍️ मुख्य संपादक :- राजेंद्र पाटील

S Maharashtra 7 News

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Post Top Ad

Responsive Ads Here

27/06/2024

श्री संत सावता माळी युवक संघांचे प्रदेशाध्यक्ष जितेंद्र महाजन यांचे महाज्योती कडून मिळणाऱ्या टॅब योजनेचा फॉर्म भरण्याचे आवाहन.....

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

         श्री संत सावता माळी युवक संघांचे प्रदेशाध्यक्ष जितेंद्र महाजन यांचे महाज्योती कडून मिळणाऱ्या टॅब योजनेचा फॉर्म भरण्याचे आवाहन.....

        या वर्षी इयत्ता 10 वी परीक्षा पास OBC, VJ,NT आणि SBC विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची सुचना JEE / NEET / MH-CET चे मोफत आॅनलाईन प्रशिक्षण, शिवाय मोफत 8 इंची टॅब, आणि दररोजचा 6 GB इंटरनेट डेटा मोफत ! ! !

          महात्मा ज्योतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योती ही महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था आहे. या महाज्योतीच्या वतीने, या वर्षी ज्या विद्यार्थ्यांनी वर्ग 11 वी सायन्स मध्ये प्रवेश घेतलेला आहे, व जे विद्यार्थी 12 वी नंतर इंजिनियरींग मेडीकल मधे प्रवेश घेण्यासाठी 2026 ची JEE / NEET व MH-CET ची स्पर्धा परीक्षा देवु इच्छितात परंतु त्यासाठी लाखो रूपयाचे महागडे कोचिंग क्लास लावु शकत नाही. अशा OBC, VJ,NT व SBC विद्यार्थ्यांसाठी, महाज्योतीच्या वतीने मोफत आॅनलाईन प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

        त्यासाठी या विषयातले अत्यंत तज्ञ प्राध्यापक हे विद्यार्थ्यांना आॅनलाईन प्रशिक्षण देईल. आॅनलाईन प्रशिक्षण देत असतांना ग्रामीण व गरीब विद्यार्थ्यां जवळ चांगले किंवा मोबाईल नसतात. ही गरज लक्षात घेवुन, महाज्योती अशा सर्व विद्यार्थ्यांना अगदी मोफत टॅब देत आहे. या शिवाय या टॅब सोबतच दररोज 6 GB इंटरनेट डेटा सुध्दा आॅनलाईन क्लास पहाता यावा, म्हणुन अगदी मोफत देत आहे. ते पुढील शिक्षणासाठीही त्यांना कामी येतील. तसेच या JEE / NEET / MH-CET स्पर्धा परीक्षेची सर्व पुस्तके विद्यार्थ्यांना मोफत घरपोच दिली जातील.

      @  टॅब योजनेचा फॉर्म भरण्यासाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत  @

     1) जातीचा दाखला 

     2) अधिवास प्रमाणपत्र (डोमेशियल)

     3) नॉन क्रिमिलीयर 

     4) 10 मार्कशीट

     5) 11 सायन्स प्रवेश पावती 

     6) 11 सायन्स प्रवेश घेतल्याचा बोनाफाईड

     7) आधार कार्ड 

     8) पासपोर्ट फोटो

     9) विद्यार्थ्यांची सही

      यासाठी विध्यार्थी यांनी महाज्योतीच्या     www.mahajyoti.org.in या वेबसाईटवर जावुन , तिथे JEE... या नोटीसबोर्डवरील जागेवर क्लीक करावे त्यावर पुढे दिलेला फार्म दिसेल तो आॅनलाईन पध्दतीने भरून त्यात नमुद केलेली कागदपत्रे अपलोड करावीत तसेच आपला संपुर्ण अर्ज अपलोड केल्यावर त्याची प्रत काढुन जवळ ठेवावी.

         ही आपली नोंदणी महाज्योतीकडे करण्यासाठी 10 जुलै 2024 ही अंतिम तारीख आहे. तरी विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी महाज्योतीच्या या योजनेचा फायदा घ्यावा.

          @  अधिक माहितीसाठी संपर्क  @

                    जितेंद्र सुरेश महाजन

                         प्रदेशाध्यक्ष

श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य मो.  9021707519

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज