बालमोहन कनिष्ठ महाविद्यालयात आषाढ मासारंभानिमित्त बरसल्या 'पाऊस शब्दधारा' - S Maharastra 7 News

S Maharastra 7  News

✍️ मुख्य संपादक :- राजेंद्र पाटील

S Maharashtra 7 News

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Post Top Ad

Responsive Ads Here

06/07/2024

बालमोहन कनिष्ठ महाविद्यालयात आषाढ मासारंभानिमित्त बरसल्या 'पाऊस शब्दधारा'

 

चोपडा (प्रतिनिधी) - -

         बालमोहन कनिष्ठ महाविद्यालयात आषाढ मासारंभानिमित्त बरसल्या ' पाऊस शब्दधारा '

         आषाढस्य प्रथम दिवसे अर्थात कविकुलगुरु कालिदासांच्या स्मरणा निमित्त अमर संस्था संचलित बालमोहन कनिष्ठ महाविद्यालयात नामवंत कवींच्या पाऊस विषयावरील संकलित कवितांचा पावसाची विविध रुपे उलगडणारा ' पाऊस शब्दधारा ' हा कार्यक्रम विलास पाटील खेडीभोकरीकर यांनी सादर केला.

        यात कवयित्री शांता शेळके , मंगेश पाडगांवकर , बहिणाबाई चौधरी , ना. धों. महानोर , कवी सौमित्र , कवी नलेश पाटील , अरुण म्हात्रे , अशोक बागवे यांच्या मुक्त छंदातील तसेच गेय कवितां मधून  विलास पाटील खेडीभोकरीकर यांनी कवी प्रतिभा व संजीवक पाऊस यांच्या चैतन्याने नटलेल्या निसर्गाची व पावसाची रुपे विद्यार्थ्यासमोर जिवंत करतांना ' पाऊस शब्दधारां ' मधून त्यांना चिंब भिजवले.

       या प्रसंगी बालमोहन कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ. प्रीती सरवैय्या मॅडम , प्रा. तुषार पाटील , दिलीप सूर्यवंशी इ. ची उपस्थिती होती .

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज