ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर यश..... - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

19/10/2024

ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर यश.....

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

         ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर यश.....

        चोपडा येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित ऑक्सफर्ड इंग्लिश मिडीयम स्कूलच्या आजी व माजी विद्यार्थ्यांचा राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर पिकल बॉल आणि बेसबॉल या खेळांमध्ये यश संपादन केल्यानिमित्त सत्कार करण्यात आला. या विद्यार्थ्यांमध्ये अंजली भूपेंद्र पोळ, जिनिषा संदेश क्षिरसागर या माजी विद्यार्थिनी आणि इयत्ता नववीत शिकत असणारा दिव्यतेज अतुल पाटील या विद्यार्थ्याचा समावेश होता. महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अॕड. संदीप सुरेश पाटील, सचिव डॉ. स्मिता संदीप पाटील यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. 

         व्हिएतनाम येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्तरावर पिकल बॉल या खेळात अंजली भूपेंद्र पोळ या विद्यार्थिनीने सोळा वर्ष वयोगटाखालील गटात एकेरी सामन्यात कांस्य पदक व दुहेरी सामन्यात रौप्य पदक प्राप्त केले. जीनिशा संदेश क्षिरसागर या विद्यार्थिनीने व्हिएतनाम येथे झालेल्या पिकल बॉल या खेळांत पहिल्या आठ खेळाडूंमध्ये स्थान प्राप्त केले. ऑल इंडिया पिकल बॉल असोसिएशन तर्फे या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. 

          शाळेतील विद्यार्थी दिव्यतेज अतुल पाटील याने राष्ट्रीय स्तरावर ऑल इंडिया पिकल बॉल असोसिएशनने आयोजित केलेल्या पानिपत, हरियाणा येथील नॅशनल पिकल बॉल टूर्नामेंट मध्ये एकेरी आणि दुहेरी सामन्यात रौप्य पदक प्राप्त केले. तसेच बेसबॉल या खेळासाठी या विद्यार्थ्याची विभागीय स्तरावर निवड झाली आहे. 

          या यशस्वी विद्यार्थ्यांच्या सत्कार प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका ममता कपिल न्याती, शाळा समन्वयक अश्विनी पाटील, क्रिडाशिक्षक भूषण गुजर, प्रा. अतुल पाटील, प्रा. भूपेंद्र पोळ, डाॅ. क्रांती क्षिरसागर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षिका कल्पना बारी यांनी केले. 

        महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अॕड. संदीप सुरेश पाटील, संस्थेच्या सचिव डाॅ. स्मिता पाटील, शाळा समन्वयक निळकंठ सोनवणे, डाॕ. दिनानाथ पाटील, अशोक साळुंखे, विलास दारूंटे, दिपक सोमानी आणि शाळेच्या मुख्याध्यापिका ममता कपिल न्याती तसेच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp