दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील कनिष्ठ महाविद्यालय, चोपडा येथे जीवशास्र विभागातर्फे पोस्टर प्रेझेंटेशन - S Maharastra 7 News

S Maharastra 7  News

✍️ मुख्य संपादक :- राजेंद्र पाटील

S Maharashtra 7 News

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Post Top Ad

Responsive Ads Here

04/01/2025

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील कनिष्ठ महाविद्यालय, चोपडा येथे जीवशास्र विभागातर्फे पोस्टर प्रेझेंटेशन


 चोपडा (प्रतिनिधी) : - -

          दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील कनिष्ठ महाविद्यालय, चोपडा येथे जीवशास्र विभागातर्फे पोस्टर प्रेझेंटेशन     

        म. गां. शि. मंडळांचे अध्यक्ष मा. भैय्यासाहेब अँड. संदीप पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त पोस्टर प्रेझेंटेशनचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी कनिष्ठ महाविद्यालयातील इ.11 वी व इ. 12 वी च्या 80 विद्यार्थ्यानी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. ज्या मध्ये विशेष उलेखणीय Plants, Animal Cell, Digestive System, Brain, Dialysis, External morphology of cockroach, Human Heart, Tooth Anatomy इत्यादी विषयांतर्गत पोस्टर सादर करण्यात आले. 
    
    पोस्टर प्रेझेन्टेशनचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. ए. सूर्यवंशी यांनी केले. यावेळी उपप्राचार्य प्रा. डॉ. आर. एम. बागूल सर, उपप्राचार्य प्रा. डॉ. के. एन. सोनवणे, उपप्राचार्य प्रा. डॉ. ए. बी. सूर्यवंशी, प्राणीशास्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. एच. जी. सदाफुले तसेच कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. एस. पी. पाटील, पर्यवेक्षक प्रा. ए. एन बोरसे, वरिष्ठ प्रा. एन. बी. शिरसाठ, प्रा. आर. इ. लांडगे, प्रा. सौ. राजश्री निकम, प्रा. शिरीष ठाकरे, प्रा. श्रीमती एस. बी. पवार मॅडम, प्रा. स्वप्नील सोनवणे तसेच कनिष्ठ महाविद्यालयाचे सहकारी बंधु - भगिनी, परिचर बंधु यांची उपस्थिती होती. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. ए. सूर्यवंशी यांनी या प्रकारचे वेगवेगळे उपक्रम राबवुन विद्यार्थ्यांन मधील विज्ञानिक दृष्टिकोण वृद्धिंगत व्हावा या साठी मार्गदर्शन केले सर्व पोस्टर तयार करण्यासाठी विषय शिक्षकांनी विद्यार्थ्यांची चांगली तयारी करून घेतली.  

        या कार्यक्रमात विद्यार्थ्याना मार्गदर्शन करतांना उपप्राचार्य  डॉ. आर. एम. बागूल Biology  (जीवशास्र) विषयाचे महत्व पटवून दिले. व हा विषय फक्त परीक्षेपुरता महत्वाचा नसून विविध स्पर्धा परीक्षा, IISER, NEET यात देखील महत्वाचा आहे असे सांगितले. या पोस्टर प्रदर्शनात प्रथम, द्वितीय, तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांचे प्राचार्य, उपप्राचार्य यांच्या हस्ते खालील प्रमाणे बक्षिसे देण्यात आले. 
        प्रथम क्रमांक :- तन्वी नरेश पाटील (11 वी अ) :- Plant & Animal Cell , द्वितीय क्रमांक :- श्रुती रमेश रामटेक (11 वी ब) :- Brain Structure , तृतीय क्रमांक :- पंकज जवखेडे पवार व रोशनी माळी (11 वी अ) :- Human veins

         तसेच विद्यार्थ्याना अशा कार्यक्रमासाठी प्रोत्साहन मिळावे या साठी उतेजणार्थ दहा विद्यार्थ्याना प्राचार्य व उपप्राचार्य यांच्या हस्ते बक्षिसे साहित्यांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. आर. इ. लांडगे केले तसेच प्रा. एस. पी. सोनवणे आभार प्रदर्शन केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज