"सुसज्ज भवनासह उत्तमरित्या कार्यरत चोपडा ज्येष्ठ नागरिक संघ जिल्ह्यातील एक अग्रेसर संघ ".... डॉ. विकास हरताळकर यांचे गौरवोद्गार ! ! - S Maharastra 7 News

S Maharastra 7  News

✍️ मुख्य संपादक :- राजेंद्र पाटील

S Maharashtra 7 News

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Post Top Ad

Responsive Ads Here

18/01/2025

"सुसज्ज भवनासह उत्तमरित्या कार्यरत चोपडा ज्येष्ठ नागरिक संघ जिल्ह्यातील एक अग्रेसर संघ ".... डॉ. विकास हरताळकर यांचे गौरवोद्गार ! !

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

         "सुसज्ज भवनासह उत्तमरित्या कार्यरत चोपडा ज्येष्ठ नागरिक संघ जिल्ह्यातील एक अग्रेसर संघ ".... डॉ. विकास हरताळकर यांचे गौरवोद्गार ! !

         चोपडा ज्येष्ठ नागरिक संघ चोपडाचे सुंदर , सुसज्ज असं कै. मगनलाल रामदास बडगुजर (साळुंखे) सभागृह , आमदार प्रा. श्री चंद्रकांत बळीराम सोनवणे यांच्या तत्कालिन निधीतून उभारलेले ज्येष्ठ नागरिक संघाचे कार्यालय , जिल्हा क्रीडा विभाग व न.प. चोपडा यांच्या सहकार्याने तयार झालेली खुली व्यायाम शाळा तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी सतत विविध सेवाभावी कार्यक्रमांचे आयोजन करणारा चोपडा ज्येष्ठ नागरिक संघ हा उत्तम रित्या कार्यरत असणारा जिल्हयातील कदाचित एकमेव व सर्वात अग्रेसर असा संघ आहे असे गौरवोद्गार ज्येष्ठ नागरिक संघ चोपडा कार्यालय व खुल्या व्यायाम शाळेचे उद्घाटन प्रसंगी सोहळा अध्यक्ष चोपडयाचे ज्येष्ठ धन्वंतरी डॉ . विकास हरताळकर यांनी काढलेत.

         यावेळी त्यांनी ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य संदर्भात विशेषतः मधुमेह जो हळूहळू आपलं शरीर पोखरत डोळे , किडनी यांना खूप नुकसान पोहचवतो तरी त्या संदर्भात काळजी घेण्यासाठी मार्गदर्शन व आवाहन केले. ज्येष्ठ नागरिक संघ , चोपडाच्या 33 व्या वर्धापन दिनानिमित्त विद्यमान आमदार प्रा. श्री.चंद्रकांत बळीराम सोनवणे व माजी आमदार सौ.लताताई चंद्रकात सोनवणे यांच्या शुभहस्ते संघ कार्यालय तसेच खुल्या व्यायाम शाळेचे उद्घाटन असा नियोजित उद्घाटन सोहळा होता परंतु मुंबई येथे उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्याकडे महत्त्वाच्या कामानिमित्त जावे लागल्याने  आ. प्रा. श्री.चंद्रकांत सोनवणे यांनी उद्धाटन सोहळ्यास आवर्जुन शुभेच्छा पाठविल्या. संघ कार्यालय कोनशिला अनावरण व कार्यालय उद्घाटन तसेच खुली व्यायाम शाळा उद्घाटन सोहळा प्रसंगी न.प.मुख्याधिकारी श्री.राहुल पाटील , कृ.उ.बा. संचालक श्री. गोपाल पाटील , ज्येष्ठ नागरिक संघ सभागृह बांधकामास अनमोल देणगी दाते श्री.विश्वनाथ रामदास बडगुर्जर (साळुंखे) , माजी नगराध्यक्ष श्री. रमणलाल गुजराथी , बंधन बँक शाखा व्यवस्थापक श्री.भरत पवार या मान्यवरांसह संघाध्यक्ष श्री.जयदेव देशमुख , उपाध्यक्ष श्री. जे. एस. नेरपगारे , सह सचिव इंजि. विलास एस्.पाटील , कोषाध्यक्ष दिलीपराव पाटील , संघ कार्यकारीणी ज्येष्ठ संचालक एम्.डब्ल्यू. पाटील , माजी कोषाध्यक्ष मुख्या . सुभाष पाटील , मधुकर पाटील अश्या अनेक आजी माजी कार्यकारिणी संचालक तसेच सदस्यांची उपस्थिती होती. 

         कार्यक्रमाचा प्रारंभ विनय पाठक यांच्या बासरी वरील गणेश वंदनेने तसेच जिजाबराव नेरपगारे यांच्या प्रार्थनेने झाला. सोहळयाचे प्रास्तविक माजी सचिव एन.डी.महाजन यांनी तर  आभार प्रा.श्याम गुजराथी  यांनी मानलेत. पसायदानाने सांगता झालेल्या या उद्घाटन  सोहळयाचे स्वागत सूत्रसंचालन तालुका फेस्कॉम सचिव शांताराम पाटील व संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघ सचिव विलास पाटील खेडीभोकरीकर यांनी केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज