"रासेयो स्वयंसेवकांच्या श्रमदानातून विष्णापूर येथे वनराई बंधारा निर्मिती" - S Maharastra 7 News

S Maharastra 7  News

✍️ मुख्य संपादक :- राजेंद्र पाटील

S Maharashtra 7 News

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Post Top Ad

Responsive Ads Here

15/01/2025

"रासेयो स्वयंसेवकांच्या श्रमदानातून विष्णापूर येथे वनराई बंधारा निर्मिती"

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

          "रासेयो स्वयंसेवकांच्या श्रमदानातून विष्णापूर येथे वनराई बंधारा निर्मिती"

         समाजकार्य महाविद्यालय, चोपडा येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष श्रमसंस्कार शिबिर "विष्णापूर" या दत्तक गावामध्ये दिनांक 8 जानेवारी ते 14 जानेवारी 2025 रोजी आयोजित करण्यात आले होते. विष्णापूर गावाजवळच्या जंगलामध्ये पाणी अडवण्यासाठी "वनराई बंधारा" विद्यार्थ्यांच्या मदतीने बांधण्यात आला. हे गाव महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत दत्तक घेण्यात आले आहे. 

         केशव स्मृती प्रतिष्ठान, जळगावचे मा. आदित्य साळवे आणि मा. राजन इंगळे यांनी विद्यार्थ्यांना "वनराई बंधारा बांधणीचे" प्रशिक्षण दिले. तसेच वनराई बंधारा प्रत्यक्ष बांधण्यामध्ये ही विद्यार्थ्यांसोबत सहकार्य केले. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्या सूचनेनुसार, रासेयो स्वयंसेवकांनी शिबिर कालावधीमध्ये गावाच्या विकासासाठी श्रमदान करून योगदान देणे महत्त्वाचे असते. त्यादृष्टीने या विशेष श्रमसंस्कार शिबिरामध्ये पाणी अडवून ते जमिनीत जिरविण्यासाठी गावालगतच्या जंगलामध्ये वनराई बंधारा श्रमदानातून बांधला. 

         प्रा. डॉ. संबोधी देशपांडे,(कार्यक्रम अधिकारी), प्रा. डॉ. उत्तम सोनकांबळे (सहाय्यक कार्यक्रम अधिकारी) यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबीर आयोजित करण्यात आले होते. शिबिराच्या नियोजनासाठी व प्रत्यक्ष कृती कार्यक्रमासाठी समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. ईश्वर सौंदाणकर, उपप्राचार्य प्रा. डॉ. आशिष गुजराथी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. गावातील सरपंच, मा. जगदीश भिल, ग्रामपंचायत सदस्य संदीप पाटील, वन विभागातील कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज