पंकज ग्लोबल पब्लिक स्कूल एज्युकेशन एक्सलन्स अवॉर्ड ने सन्मानित - S Maharastra 7 News

S Maharastra 7  News

✍️ मुख्य संपादक :- राजेंद्र पाटील

S Maharashtra 7 News

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Post Top Ad

Responsive Ads Here

12/02/2025

पंकज ग्लोबल पब्लिक स्कूल एज्युकेशन एक्सलन्स अवॉर्ड ने सन्मानित

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

         पंकज ग्लोबल पब्लिक स्कूल  एज्युकेशन एक्सलन्स अवॉर्ड ने सन्मानित

         पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्था संचलित, पंकज ग्लोबल पब्लिक स्कूल एज्युकेशन एक्सलन्स अवार्डने सन्मानित करण्यात आली आहे. पंकज शैक्षणिक आणि सामाजिक संस्थाचे अध्यक्ष डॉ. सुरेश बोरोले आणि पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलचे प्राचार्य मिलिंद पाटील यांना हा सन्मान केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री डॉ. सुकांत मजुमदार आणि सुप्रीम कोर्टाचे मा. न्यायमूर्ती दीपक वर्मा  यांच्या उपस्थितीत भारत सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे संयुक्त सचिव महावीर सिंघवी यांच्या हस्ते  दिल्ली येथे प्रदान करण्यात आला. 

          या पुरस्कारासाठी संपूर्ण भारतातील नामवंत शाळांचे परीक्षण विविध मुद्द्यांच्या आधारे करण्यात आले, त्यात विशेष करून संस्थेतील संचालक मंडळ यांनी शालेय गुणवत्तेसाठी दिलेले योगदान, मागील पाच वर्षांची विद्यार्थी संख्या व शालेय गुणवत्ता, शाळेत उपलब्ध असलेल्या भौतिक सुविधा, शाळेने राष्ट्रीय एकात्मता साठी केलेले कार्य, स्वच्छतेसाठी शाळेने केलेले प्रयत्न, शाळेतील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय पातळीवर मिळवलेले यश, इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेमधील निकाल व गुणवत्ता,  स्पर्धा परीक्षेतील यश, शिक्षकवृंदाची अध्यापनाची पद्धती व प्रशिक्षणे, एन ई पी 2020 बद्दल शाळेने राबविलेले विविध उपक्रम, आधुनिक तंत्रज्ञान, रोबोटिक्स लॅब, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, व्हर्चुअल रियालिटी सारख्या तंत्रज्ञानाचा शाळेने केलेला वापर व सहभाग इत्यादी नुसार शाळेची निवड करण्यात आली. 

         या पुरस्कारासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून 5 शाळांची निवड करण्यात आली होती. त्यात Non Metro Group Residential cum Day Boarding गटात पंकज ग्लोबल पब्लिक स्कूल या एकमेव शाळेची निवड करण्यात आली. या प्रसंगी केद्रीय शिक्षण राज्य मंत्री डॉ. सुकांत मजुमदार  यांनी संस्थेचे अध्यक्ष, प्राचार्य व सर्व कर्मचारीवर्ग यांच्या ऊत्कृष्ट कार्याबद्दल गौरवोद्गार काढले. 

         राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्या बद्दल संस्थेचे संचालक पंकज बोरोले, सर्व संचालक मंडळ , विविध शाखांचे विभाग प्रमुख यांनी पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलचे प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे अभिनंदन केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज