ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात साजरा - S Maharastra 7 News

S Maharastra 7  News

✍️ मुख्य संपादक :- राजेंद्र पाटील

S Maharashtra 7 News

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Post Top Ad

Responsive Ads Here

03/06/2025

ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात साजरा

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

         ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात साजरा

          चोपडा येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूलच्या सीबीएसई बोर्डाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत विशेष गुणवत्ता संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला.

          अनिरुद्ध महेंद्र धनगर या विद्यार्थ्याने 95 % गुण प्राप्त करून चोपडा तालुक्यात प्रथम आला आहे. चोपडा तालुक्यात द्वितीय क्रमांक प्राप्त करण्याचा मानही ऑक्सफर्ड शाळेलाच मिळाला असून चि. लविश विशाल पालिवाल यास 93•4 % गुण मिळवत  प्राप्त केला आहे. तर तालुक्यात मुलींमध्ये प्रथम क्रमांक हिरल चेतन ठक्कर या विद्यार्थिनीने प्राप्त केला आहे. तिला 91•2 % गुण मिळाले. 

        हर्षित कैलास पालिवाल 92•2 %, मानस नरेन्द्र पाटील 91•8 %, हिरल चेतन ठक्कर 91•2 %, नाविन्य सुनील चौधरी 90•40 %, श्रावणी नरेश शिंदे 9•40 % या विद्यार्थ्यांना देखील शेकडा 90 % वर गुण प्राप्त झाले आहेत. शाळेतील 17 विद्यार्थ्यांना एकूण 80 ते 90 टक्के गुण प्राप्त झाले आहेत, त्यात अभिनव अशोक साळुंखे 89•40 %, शार्ली रामकृष्ण महाजन 89•40 %, हिमानी देवानंद  गेही 86•6 %, राज दिनेश सोनवणे 86•6 %, सृष्टी विष्णू सैंदाणे 86•6 %, लक्ष्मी सुरेश महाजन 85•8 %, हितेश अनिल पाटील 85•6 %, सुष्मिता अनिल शिरसाठ 85•6 %, अनोषा फातिमा जीशान असद सय्यद 85 %, यश निलाचंद पाटील 84•6 %, आयुष रितेश जैन 84 %, हार्दिक मनीष अग्रवाल 83•6 %, कनक भरत धनगर 83•6 %, वर्धमान दिलीप सपकाळे 83 %, सर्वेश मच्छिंद्र सैंदाणे 82•8 %, गार्गी नितीन चौधरी 81•6 %, पारस अभय जैन 80•2 % या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. शाळेतील 39 विद्यार्थ्यांना शेकडा 70 % च्या वर गुण प्राप्त झाले आहेत.

            या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या पालकांचा सत्कार महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अॕड. संदीप सुरेश पाटील, सचिव डॉ. स्मिता संदीप पाटील, डाॕ. सुरेश जी. पाटील महाविद्यालय चोपडा चे प्रभारी प्राचार्य डॉ. के. एन. सोनवणे, डी. जी. सोमाणी, अशोक साळुंखे, मुख्याध्यापिका ममता कपिल न्याती यांच्या हस्ते करण्यात आला. अनिरुद्ध धनगर या विद्यार्थ्याने आय.टी. या विषयात शंभर पैकी शंभर गुण प्राप्त केले. या विद्यार्थ्याचा देखील विशेष सत्कार या प्रसंगी करण्यात आला. या सर्व विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिका ममता कपिल न्याती, दीप्ती पाटील,  विशाखा बडगुजर, जगदीश पाटील, विशाल मराठे, पूनम पाटील, हर्षा पाटील, शकील अहमद, भूषण गुजर आणि दिपाली पाटील या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

           याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष अॕड. संदीप सुरेश पाटील यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन आणि कौतुक केले. विद्यार्थ्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी बहुमोल मार्गदर्शन केले. याप्रसंगी मुख्याध्यापिका ममता कपिल न्याती यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी देखील केले.  विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून अनिरुद्ध धनगर या विद्यार्थ्याने मनोगत व्यक्त केले तर पालक प्रतिनिधी म्हणून ललिता पाटील, रुपाली पालीवाल आणि कल्पना महाजन यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तसेच आभार प्रदर्शन दिप्ती पाटील आणि अश्विनी पाटील यांनी केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज