कठोर परिश्रमाने स्वप्न साध्य करून असामान्य व्यक्तिमत्व घडते - - लेफ्टनंट अनिकेत महाजन - S Maharastra 7 News

S Maharastra 7  News

✍️ मुख्य संपादक :- राजेंद्र पाटील

S Maharashtra 7 News

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Post Top Ad

Responsive Ads Here

06/07/2025

कठोर परिश्रमाने स्वप्न साध्य करून असामान्य व्यक्तिमत्व घडते - - लेफ्टनंट अनिकेत महाजन

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

          कठोर परिश्रमाने स्वप्न साध्य करून असामान्य व्यक्तिमत्व घडते - - लेफ्टनंट अनिकेत महाजन

         चोपडा येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी व्यवसाय मार्गदर्शन या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. शाळेचे माजी विद्यार्थी लेफ्टनंट अनिकेत किरण महाजन आणि संचिता संजय बारी यांनी आपापल्या क्षेत्राविषयी  विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका ममता कपिल न्याती, उपमुख्याध्यापिका अश्विनी खंडेराव पाटील, इयत्ता नववी व दहावीचे विद्यार्थी आणि शिक्षक उपस्थित होते.

          भारतीय सैन्य दलात लेफ्टनंट या पदावर अनिकेत किरण महाजन या माजी विद्यार्थ्याची नियुक्ती झाली. हे उज्वल यश संपादन केल्या निमित्त अनिकेत महाजन या माजी विद्यार्थ्याचा सत्कार करण्यात आला. नीफ्ट ( NIFT) 2025 प्रवेश परीक्षेत शाळेची माजी विद्यार्थीनी संचिता संजय बारी हिने राष्ट्रीय स्तरावर ११३८ रँक प्राप्त करून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्यानिमित्त तिचाही सत्कार करण्यात आला. शाळेच्या या दोन्ही माजी विद्यार्थ्यांनी आपापल्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक गुणवत्ता, प्रशिक्षण याविषयी सविस्तर माहिती सांगितली. 

          लेफ्टनंट अनिकेत महाजन यांनी भारतीय सैन्य दलात सामील होण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांविषयी माहिती सांगितली. स्पर्धा परीक्षांसोबतच आवश्यक  असणाऱ्या शारीरिक क्षमता, चिकाटी, जिद्द, कठीण परिश्रम करण्याची मनाची तयारी याविषयी मार्गदर्शन केले. अनिश्चित आणि अनपेक्षित असा प्रसंगांना सामोरे जाण्यासाठी तसेच अपयशातून यशाकडे जाणारी वाट शोधण्यासाठी सतत शिकत राहणे आवश्यक आहे. असामान्य कृती करायची असेल तर योग्य निर्णयक्षमता आणि कठोर परिश्रमांना पर्याय नाही. भोवतालच्या परिस्थितीचा, जगाचा, आपली भौगोलिक परिस्थिती, इतिहास यांसारख्या विविध विषयांच्या संदर्भात वाचन करणे अत्यंत आवश्यक आहे असे मत लेफ्टनंट अनिकेत महाजन यांनी व्यक्त केले. 

         ऑक्सफर्ड शाळेची माजी विद्यार्थिनी संचिता संजय बारी हिने B. Des. या अभ्यासक्रमा विषयी सविस्तर माहिती सांगितली. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षा जसे NID, NIFT, UCEED याविषयी सविस्तर माहिती सांगितली. या परीक्षांच्या विविध टप्प्यांविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. 

          डिझायनर म्हणून करियर निवडायचे असल्यास डोळे व कान सतत उघडे ठेवून सभोवतालच्या परिसराचे जाणीवपूर्वक सखोल निरीक्षण करणे आवश्यक आहे. समस्यांविषयी अधिक जाणून घेऊन त्यावर उपाययोजना करण्यासाठी एक प्रॉडक्ट डिझायनर कशी मदत करू शकतो याविषयी दाखले देऊन विद्यार्थ्यांना स्पष्ट करून सांगितले. आऊट ऑफ द बॉक्स थिंकिंग आपल्याला यशाच्या अधिक जवळ घेऊन जाते. त्यासाठी वाचन आणि निरीक्षण अत्यंत आवश्यक आहे असे मत व्यक्त केले. 

         सोशल मीडियाचा वापर केवळ मनोरंजनासाठी न करता आपाल्या आवडत्या क्षेत्रातील माहिती जाणून घेण्यासाठी सुयोग्य पद्धतीने करावा. वेळेचे नियोजन आणि कठोर परिश्रमाने स्वप्न साध्य करण्यासाठी दोन्ही मार्गदर्शकांनी विद्यार्थ्यांना प्रेरित केले. 

          कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षिका दीप्ती पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका ममता कपिल न्याती यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज