नागलवाडी माध्यमिक विद्यालयाची भर पावसात ग्रंथदिंडी काढून शिक्षक व विद्यार्थ्यांची भरली विठ्ठल नामाची शाळा. - S Maharastra 7 News

S Maharastra 7  News

✍️ मुख्य संपादक :- राजेंद्र पाटील

S Maharashtra 7 News

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Post Top Ad

Responsive Ads Here

06/07/2025

नागलवाडी माध्यमिक विद्यालयाची भर पावसात ग्रंथदिंडी काढून शिक्षक व विद्यार्थ्यांची भरली विठ्ठल नामाची शाळा.

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

          नागलवाडी माध्यमिक विद्यालयाची भर पावसात ग्रंथदिंडी काढून शिक्षक व विद्यार्थ्यांची भरली विठ्ठल नामाची शाळा.

          आज आषाढी एकादशी निमित्त नागलवाडी गावात माध्यमिक विद्यालय नागलवाडी शाळेची ग्रंथ दिंडी खूप उत्साहात निघाली.सकाळी 7.30 वाजता गावातील विठ्ठल रुखमाई मंदिरात मुख्याध्यापक पी.डी.पाटील, माजी सरपंच व ज्येष्ठ नागरिक धरमदास आण्णा , गावाचे सरपंच प्रताप नाईक, उपसरपंच सचिन पाटील, माजी सरपंच राजेंद्र रामसिंग पाटील, गोपाल गबा  पाटील, नागलवाडी केंद्राचे केंद्रप्रमुख देवेंद्र पाटील, रुबी आर.पी. यांच्या हस्ते नारळ फोडून पूजन करण्यात आले.  

         तसेच प्रमोद पाटील, मोहन पाटील, दिलीप पाटील, डॉ.पी.एन.महाजन, नितीन पाटील, अंकुश पाटील, गोविंदा आप्पा व ग्रामस्थांनी विठ्ठल रखुमाई व ग्रंथदिंडी पूजन करून दिंडीला सुरुवात केली.शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वच्छता , मुलींचे शिक्षण, व्यसनमुक्ती अशी समाज प्रबोधनपर पथनाट्य सादर केली.

          तसेच सर्व विद्यार्थ्यांनी, शिक्षक बंधू भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी यांनी गोल रिंगण करून विठ्ठल नामावर ठेका धरला. त्यांनी मान्यवरांची, ग्रामस्थांची मने जिंकली. पावसातील ग्रंथदिंडी मध्ये गावातील मान्यवर, ग्रामस्थ, विद्यार्थी तसेच शिक्षकांनी सहभाग घेतला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज