ओम शांती केंद्रात दिवाळी उत्सव सद्भावना संदेशांनी रंगला..... - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

24/10/2025

ओम शांती केंद्रात दिवाळी उत्सव सद्भावना संदेशांनी रंगला.....

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

          ओम शांती केंद्रात दिवाळी उत्सव सद्भावना संदेशांनी रंगला.....

          चोपडा ओम शांती केंद्रात दिवाळीच्या निमित्ताने महालक्ष्मी पूजन, पाडवा व भाऊबीज हे तिन्ही सण अत्यंत भक्तिभावाने व उत्साहात साजरे करण्यात आले. संपूर्ण केंद्र परिसर दिवाळीच्या रोषणाईने आणि आनंदाच्या माहोलने उजळून निघाला होता.

         महालक्ष्मी पूजनाच्या दिवशी उत्कृष्ट असा आध्यात्मिक ड्रामा सादर करण्यात आला. या नाट्यप्रयोगात महालक्ष्मीची भूमिका करिष्मा दिदी यांनी प्रभावीपणे साकारली, तर नारदची भूमिका कुणाल सोनार यांनी उत्तमपणे साकारली. ब्रह्माकुमारीजची प्रेरणादायी भूमिका शितल दिदी यांनी सादर केली. या ड्रामामधून शांती, सकारात्मकता आणि आध्यात्मिकतेचा अनमोल संदेश उपस्थितांपर्यंत पोहोचविण्यात आला.

          पाडव्याच्या निमित्ताने विविध प्रकारचे आनंददायी खेळांचे आयोजन करण्यात आले. सर्व वयोगटातील सहभागी भावंडांनी यामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवत सणाचा आनंद द्विगुणित केला.
          भाऊबीजेच्या दिवशी युक्ता पाटील, किंजल पाटील आणि श्रेया पाटील यांनी सादर केलेल्या अप्रतिम नृत्यांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. या नृत्यांमधून स्नेह, समर्पण आणि सणाची ऊब प्रकट झाली.

         या विशेष दिवशी केंद्राच्या संचालिका मंगलादीदी यांनी भावपूर्ण शुभेच्छा संदेश देत प्रत्येक भावंडाच्या जीवनात प्रेम, ऐक्य आणि अध्यात्मिक संपदा नांदो अशी सदिच्छा व्यक्त केली. तसेच भावांना गिफ्ट स्वरूपात प्रेमाची निशाणी भेट देण्यात आली.
         सदर कार्यक्रमासाठी चोपडा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अॅड. संदीप सुरेश पाटील, स्मिता संदीप पाटील, घनशाम अण्णा पाटील, डॉ. लोकेंद्र महाजन, डॉ. पवन पाटील यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

         कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंगलादीदी, सारिका दिदी, शीतल दिदी, करिश्मा दिदी तसेच ओम शांती केंद्रातील इतर बहिणींनी मोलाचे योगदान दिले. कार्यक्रमानंतर सर्वांसाठी ब्रह्मभोजनाचे आयोजन करून स्नेहसबंध अधिक दृढ करण्यात आला.

        दिवाळीच्या या उत्सवातून प्रेम, शांती, आध्यात्मिक एकात्मता आणि आनंदाचा सुंदर संदेश संपूर्ण समाजाला देण्यात आला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp