ट्रेसर्स संघटनेच्या 12 व्या अधिवेशनात सेवानिवृत्त अनुरेखकांचा यथोचित सत्कार संपन्न... - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

30/01/2026

ट्रेसर्स संघटनेच्या 12 व्या अधिवेशनात सेवानिवृत्त अनुरेखकांचा यथोचित सत्कार संपन्न...

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

          ट्रेसर्स संघटनेच्या 12 व्या अधिवेशनात सेवानिवृत्त अनुरेखकांचा यथोचित सत्कार संपन्न...

          नागरी गौरव सत्कार समारंभ हे कौतुकाचे आणि कृतज्ञतेचे माध्यम आहे. योग्य गुणांना आणि कर्तृत्वाला योग्य मंचावर सन्मानित करणे हे सुदृढ समाजाचे लक्षण आहे. हा समारंभ समाजाला प्रगतीच्या दिशेने घेऊन जात असतो या आशयाच्या पूर्ततेसाठी ट्रेसर्स असोसिएशन कृषी विभाग महाराष्ट्र राज्यांच्या संघटनेचे 12 वे राज्यव्यापी अधिवेशन परभणी जिंतूर रोड वरील श्रीहरी मंगल कार्यालयाच्या भव्य रंगमंच्या वर  सेवानिवृत्त अनुरेखकांचा सपत्नीक  आणि विविध क्षेत्रात यशस्वी व उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अनुरेखक अधिकारी, उद्योजक, व्यावसायिक, दुर्लक्षित उपेक्षित कलावंतांचा ट्रेसर्स संघटनेच्या वतीने राज्याचे अध्यक्ष वेंकटेश हालिंगे, उपाध्यक्ष व मुख्य संयोजक अंबादास क्षीरसागर, कोषाध्यक्ष विलास पोवार, सरचिटणीस जयप्रकाश कामडी, उपाध्यक्ष यशवंत जडे, उपाध्यक्ष नरेंद्र चव्हाण, उपाध्यक्ष केशव मदनकर, उपाध्यक्ष आर आर बनपुरे, उपाध्यक्ष तथा महिला प्रतिनिधी सौ अश्विनीताई कोळेकर, कायदेशीर सल्लागार ॲड. सी एस शहाभाई इत्यादींच्या हस्ते एकाच वेळी मंचावरती उपस्थित विभागनिहाय जिल्हा निहाय पन्नास पन्नास जोडप्यांचा सुहृद्य सत्कार सोहळा संपन्न करण्यात आला.

         यावेळी पुणे विभागाचे नेतृत्व करणारे पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष रामा पांढरे यांच्या नेतृत्वात पुणे विभागातील सोलापूर, अहिल्यानगर व पुणे जिल्ह्यातील बंधू व भगिनी  अनुरेखक  पती-पत्नी यांचा सत्कार संपन्न करण्यात आला त्यानंतर लातूर संभागातील प्रतिनिधी व विभागीय सचिव अंबादास क्षीरसागर व नंदकुमार परांडकर यांच्या नेतृत्वाखाली लातूर नांदेड परभणी हिंगोली व धाराशिव जिल्ह्यातील 150 पती-पत्नी अनुरेखक यांचाही यथोचित सत्कार सोहळा संपन्न करण्यात आला. त्यानंतर अमरावती विभागातील विभागाचे उपाध्यक्ष केशव मदनकर व विभागीय सचिव  किशोर शास्त्रकार यांच्या नेतृत्वाखाली जवळजवळ 60 अनुरेखक जोडप्यांचा  येथे सत्कार सोहळा संपन्न करण्यात आला. त्यानंतर नागपूर संभागातील प्रतिनिधी सरचिटणीस जयप्रकाश कामडी व विभागीय सचिव प्रकाश कडू यांच्या नेतृत्वाखालील अधिवेशनात सहभागी झालेले सुमारे 40 अनुरेखक जोडप्यांचा येथे सत्कार सोहळा संपन्न करण्यात आला. 

          यानंतर नाशिक विभागातील विभागाचे उपाध्यक्ष यशवंत जडे व विभागीय सचिव  किरण पाटील यांच्या नेतृत्वाखाली अधिवेशनात सहभागी झालेल्या नंदुरबार जळगाव धुळे व नाशिक जिल्ह्यातील अनुरेखक जोडप्यांचा यथोचित सत्कार सोहळा संपन्न करण्यात आला. यानंतर कोल्हापूर संभागातील संभागाचे प्रतिनिधी सन्माननीय विलास पोवार साहेब कोषाध्यक्ष व विभागीय सचिव श्री आर एम चव्हाण व महिला प्रतिनिधी सौ अश्विनीताई कोळेकर यांच्या नेतृत्वाखाली सांगली कोल्हापूर व सातारा येथील सहभागी झालेले अनुरेखक पती पत्नी 70 ते 75 जोडप्यांचा  सुहृद्य सत्कार सोहळा संपन्न करण्यात आला. त्यानंतर कोकण विभागाचे प्रतिनिधी तथा उपाध्यक्ष नरेंद्र चव्हाण व विभागीय सचिव सत्यजित कोमनाक यांच्या नेतृत्वाखाली ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील उपस्थित अनुरेखक व त्यांच्या सुविद्य धर्मपत्नी सह येथे सत्कार समारंभ संपन्न करण्यात आला. यानंतर छत्रपती संभाजी नगर विभागाचे प्रतिनिधी उपाध्यक्ष आर आर बनपुरे  विकास निगवेकर व  पद्माकर महामुनी यांच्या नेतृत्वाखाली अधिवेशनात सहभागी झालेल्या अनुरेखक पती-पत्नींचा महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने जालना, बीड व छत्रपती संभाजी नगर या जिल्ह्यातील उपस्थित अनुरेखक बंधू आणि भगिनींचा सह पत्नीक  सत्कार सोहळा संपन्न करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष व्यंकटेश हालिंगे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून वरिष्ठ अनुरेखक व माजी सरचिटणीस माननीय भिकाजी सातव पुणे व संघटनेचे वरिष्ठ अनुरेखक मार्गदर्शक व कायदेशीर सल्लागार  सी एस शहाभाई धुळे हे होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश कडू यांनी केले तर प्रस्ताविक जयप्रकाश कामडी यांनी केले.

          ट्रेसर्स असोसिएशन कृषी विभाग महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष वेंकटेश हलिंगे यांनी अध्यक्षीय समारोप करून सर्व अनुरेख बांधवांचे अभिनंदन केले व भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या नंतर अधिवेशन संयोजक अंबादास क्षीरसागर यांच्या आभार प्रदर्शनाने दोन्ही सत्र अतिशय आनंदाच्या मंगलमय वातावरणात यशस्वी संप्पन्न झाले याबद्दल सर्वत्र पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन होत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp