चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा ; कलाशिक्षक चमकणार राज्यस्तरावर.... - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

04/01/2026

चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा ; कलाशिक्षक चमकणार राज्यस्तरावर....

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

          चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा ;  कलाशिक्षक चमकणार राज्यस्तरावर....

         महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग संचलित राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था डायट जालना आयोजित राज्यस्तरीय शालेय विविध क्लब सादरीकरण स्पर्धेत नंदुरबार येथे संपन्न झालेल्या विभाग स्तर स्पर्धेत 32 स्पर्धकां मधून प्रथम क्रमांक राकेश राजकुमार विसपुते कलाशिक्षक विवेकानंद विद्यालय, निमगव्हाण केंद्र, तालुका चोपडा, जिल्हा जळगाव, विभाग नाशिक यांनी पटकावला. विवेकानंद विद्यालयात सुरू असलेल्या विविध क्लब पैकी एक क्लब मशीन व रोबोटिक्स क्लबचे जून पासून तर आतापर्यंतचे केलेल्या कार्याचे सादरीकरण विभाग स्तरावर अतिशय सुंदर पद्धतीने मांडले व प्रथम क्रमांक पटकावित राज्यस्तरावर झेप घेतली आहे. 9 जानेवारीला जालना येथे राज्यस्तरीय स्पर्धा संपन्न होणार आहेत त्यात ते नाशिक विभाग, जळगाव जिल्हा, चोपडा तालुका, निमगव्हाण केंद्र, विवेकानंद विद्यालयाचे प्रतिनिधित्व करतील. 

         या यशासाठी जळगाव डाएट विभागातील सर्व अधिकारी, अधिव्याख्याते, शिक्षण विभागातील सर्व अधिकारी, तसेच संस्थेचे अध्यक्ष डॉ. विकास हरताळकर, उपाध्यक्ष घनशाम अग्रवाल, सचिव अॅड. रवींद्र जैन, सहसचिव डॉ.विनीत हरताळकर, मुख्याध्यापक नरेंद्र भावे यांच्या सर्व सहकारी शिक्षक बंधू भगिनी ,पालक वर्ग व विद्यार्थी वृंद यांनी अभिनंदन व कौतुक केले. व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्यात.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp