आपली जीभच आपली नाती आणि शरीर खराब करते ~ डॉ. मिलिंद सरदार - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...
ताज्या बातम्या
मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)    |    बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288    |    निष्पक्ष आणि वेगवान बातम्यांसाठी पाहत राहा S Maharashtra 7 News...

Post Top Ad

Responsive Ads Here

27/02/2026

आपली जीभच आपली नाती आणि शरीर खराब करते ~ डॉ. मिलिंद सरदार

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

        आपली जीभच आपली नाती आणि शरीर खराब करते ~ डॉ. मिलिंद सरदार

          आदर्श जीवनासाठी अर्धपोटी राहणे, सात्विक आहार, जेवणाच्या वेळा, सकारात्मक विचार, बोलण्यावर नियंत्रण, प्राणायाम, ध्यान आवश्यक आहे. असंतुलीत आहार, व्यायामाचा अभाव, मानसिक ताणतणाव हीच मानवी अनारोग्याची मुख्य कारणे आहेत. चव आवडली म्हणून अती खाल्ल्याने व दुसऱ्याच्या भावनेचा आदर न करता वाटेल ते बोलल्याने आपले नुकसान होते. आपली जीभच आपली नाती आणि शरीर खराब करते, असे सांगत आपल्यातील बदलांना सुरुवात करणे आवश्यक असल्याचे माधवबाग कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. मिलिंद सरदार (पुणे) यांनी मिश्किल भाषेत सांगितले.

          डॉ. मिलिंद सरदार चोपडा येथील महाराष्ट्र साहित्य परिषद आयोजित प्रियजन स्मृती व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफताना 'आनंदी आणि सुदृढ जीवनाची गुरुकिल्ली' या विषयावर श्रोत्यांशी संवाद साधत होते. येथील पंकज बाल संस्कार केंद्राच्या आवारात सुरु असलेल्या व्याख्यानमालेच्या प्रसंगी मंचावर प्रायोजक डॉ. विकास हरताळकर, कुसुम पाटील, भूपेंद्र पाटील यांच्यासह पंकज समूहाचे डॉ. सुरेश बोरोले, उपनगराध्यक्ष पंकज बोरोले, शाखेचे अध्यक्ष अशोक सोनवणे, उपाध्यक्ष राजेंद्र महाजन, कार्याध्यक्ष विलास पाटील उपस्थित होते.
        याप्रसंगी बोलतांना ते पुढे म्हणाले, सद्यस्थितीत भारतात 56 टक्के हृदयरोगाचे रुग्ण आहेत तर परदेशात फक्त 26 टक्के रुग्ण आहेत. कारण आपल्याकडे अतीत्रास झाल्यानंतर डॉक्टरकडे जाण्याची मानसिकता आहे. प्रतिबंधात्मक उपाय करण्याकडे आणि तशा जीवनशैलीकडे आपण दुर्लक्ष करतो. सगळे आजार आपणच आपल्या घरात निर्माण करतो तसेच ते आपणच दूर करु शकतो. त्यासाठी आपल्या दररोजच्या आहारात पालेभाज्या, फळभाज्या आणि कोशिंबिरी आवश्यक आहेत. रात्री 7 नंतर जेवू नये तसेच भूक लागेल तेव्हा आणि भूक असेल तेवढेच खावे. दररोज 3 किमी चालावे व नियमित व्यायाम करावा. नियमित प्राणायाम व ध्यान करावे. यासोबत जीवन जगत असताना माफी मागणे आणि माफ करणे, हे धोरण असावे. जगावर प्रेम करावे. स्वतःचा अहंकार सोडात इतरांच्या चांगल्या कामाचे कौतुक करावे. दररोज भरपूर हसावे. आनंदी आणि सुदृढ जीवनाची गुरुकिल्ली आपल्या स्वतः जवळ आहे. यावेळी व्याख्यानानादरम्यान 'कधीपासून सुरुवात करणार ?' हा प्रश्न पुन्हा पुन्हा विचारत त्यांनी उपस्थितांना विचार करुन अंतर्मुख व्हायला लावले. 

          प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक सोनवणे यांनी तर सूत्रसंचालन प्रा. संदीप पाटील यांनी, वक्त्यांचा परिचय प्रभाकर महाजन यांनी व आभार प्रदर्शन धनश्री सनेर यांनी केले. यावेळी प्रायोजकांचा सत्कार करण्यात आला. व्याख्यानास श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp