ज्येष्ठांच्या सेवाभावी वाटचालीचा राज्यस्तरावर गौरव ; चोपडा ज्येष्ठ नागरिक संघास "सर्वोत्कृष्ट संघ" पुरस्कार... ! - S Maharastra 7 News Reg No, MH-14-0018812
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

05/10/2026

ज्येष्ठांच्या सेवाभावी वाटचालीचा राज्यस्तरावर गौरव ; चोपडा ज्येष्ठ नागरिक संघास "सर्वोत्कृष्ट संघ" पुरस्कार... !

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

          ज्येष्ठांच्या सेवाभावी वाटचालीचा राज्यस्तरावर गौरव ; चोपडा ज्येष्ठ नागरिक संघास "सर्वोत्कृष्ट संघ" पुरस्कार... !

         चोपडा ज्येष्ठ नागरिकांच्या विविध सामाजिक, आरोग्यविषयक व सेवाभावी उपक्रमांत सातत्याने योगदान देणाऱ्या चोपडा ज्येष्ठ नागरिक संघास यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई यांच्या वतीने आयोजित ‘ज्येष्ठ नागरिक राज्यस्तरीय कृतज्ञता सन्मान सोहळा – वर्ष 27 वे’ या सोहळ्यात राज्यातील सर्वोत्कृष्ट संघ म्हणून सन्मानित करण्यात आले.

          मुंबई येथे झालेल्या या सोहळ्यात सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अभय ओक प्रमुख अतिथी म्हणून, तर सोहळ्याचे अध्यक्ष माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांच्या प्रमुख उपस्थितीत चोपडा ज्येष्ठ नागरिक संघाच्या प्रतिनिधींनी हा मानाचा पुरस्कार स्वीकारला. चोपडा ज्येष्ठ नागरिक संघाने यापूर्वीही आपल्या कार्याची उल्लेखनीय छाप उमटविली आहे. जिल्हास्तरीय सर्वोत्कृष्ट संघाचा सन्मान, विभागस्तरावरील पूरग्रस्त मदतनिधी संकलनात प्रथम क्रमांक तसेच फेस्कॉमच्या माध्यमातून ग्रामीण भागातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल मिळालेला गौरव, अशा विविध सन्मानांनी संघाच्या कार्याची दखल घेण्यात आली आहे.

           संघाच्या पूर्वसूरींपासून आजच्या विद्यमान कार्यकारिणीपर्यंत ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध कार्यक्रम, आरोग्य तपासणी व आरोग्यविषयक शिबिरे, सामाजिक उपक्रम आणि जनजागृतीपर कार्यक्रम सातत्याने राबविण्यात आले आहेत. या प्रदीर्घ सेवाभावी वाटचालीला भौतिक सुविधांचीही जोड मिळाली आहे. तसेच माजी आ. सौ. लता सोनवणे यांच्या आमदार निधीतून संघ कार्यालय व आवारातील पेव्हर ब्लॉक, दानशूर व्यक्तींच्या सहकार्यातून सर्व सुविधायुक्त संघ भवन, नगरपालिकेच्या माध्यमातून खुली व्यायामशाळा, वर्तमानपत्र वाचन कट्टा, तसेच सभासद निधीतून संरक्षक भिंत व मुख्य प्रवेशद्वार अशा विविध सुविधा संघाच्या कार्याला बळ देणाऱ्या ठरल्या आहेत.

          ज्येष्ठ नागरिकांच्या सक्रिय सहभागातून उभ्या राहिलेल्या या सेवाभावी चळवळीचा राज्यस्तरीय सर्वोच्च सन्मानाने झालेला गौरव हा संघाच्या कार्याचा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. पुरस्कार स्वीकारण्यासाठी संघाचे अध्यक्ष श्री. जयदेव देशमुख, माजी अध्यक्ष श्री. व्ही. एच. करोडपती, उपाध्यक्ष श्री. जिजाबराव नेरपगारे, सचिव विलास पाटील (खेडीभोकरीकर), कोषाध्यक्ष श्री. भालचंद्र विठ्ठलराव साळुंखे, स्वीकृत सदस्य प्रा. एस. एम. पाटील, श्री. गोकुळ वामन पाटील, श्री. परशुराम पेंढारकर, सौ. राधाताई देशमुख, सौ. निर्मलाताई रमेश चौधरी, श्री. रमेश व्ही. चौधरी व श्री. धर्मा मराठे उपस्थित होते. “हा सन्मान केवळ पदाधिकारी किंवा एखाद्या व्यक्तीचा नसून, चोपडा ज्येष्ठ नागरिक संघाच्या सामूहिक सेवाभावाचा आहे.

         चोपड्यातील ज्येष्ठ नागरिकांनी वर्षानुवर्षे जपलेल्या सामाजिक बांधिलकीला आणि संघाच्या सामूहिक प्रयत्नांना मिळालेला हा मानाचा मुजरा आहे,” अशी भावना संघाध्यक्ष जयदेव देशमुख व सचिव विलास पाटील (खेडीभोकरीकर) यांनी व्यक्त केली. चोपडा ज्येष्ठ नागरिक संघाच्या दीर्घ सेवाभावी वाटचालीला मिळालेला हा राज्यस्तरीय सन्मान म्हणजे चोपड्याच्या ज्येष्ठांच्या कार्याचा आणि सामाजिक संस्कारांचा गौरव असल्याची भावना व्यक्त होत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp