कुऱ्हा काकोडा परिसरात अवैध धंद्याना ऊत येथे पोलीस स्टेशन निर्मितीची मागणी - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

10/02/2022

कुऱ्हा काकोडा परिसरात अवैध धंद्याना ऊत येथे पोलीस स्टेशन निर्मितीची मागणी

 

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) कैलास कोळी :--

    कुऱ्हा काकोडा परिसरात अवैध धंद्याना ऊत येथे पोलीस स्टेशन निर्मितीची मागणी....

    कुऱ्हा काकोडा मुक्ताईनगर तालुक्यातील हे गाव 35 किलोमीटर अंतरावर आहे.कुऱ्हा काकोडा  बुलढाणा व जळगाव आणि मध्य प्रदेश चे त्रिवेणी संगम आहेत.मुक्ताईनगर मध्ये जेवढे अवैध धंदे नसतील त्याच्यापेक्षाही दुप्पटअवैद्य धंदे कुऱ्हा काकोडा  गावात व  परिसरात सुरू आहेत,गुन्हेगारीचा  अड्डा कुऱ्हा काकोडा परिसर बनला आहे.जळगाव जिल्ह्याचे  शेवटच टोक आहे कुऱ्हा ते जळगाव 100 कि,मी  मीटर अंतरआहे.

 

   या परिसरात काही घटना घडल्यास मुक्ताईनगर किंवा जळगाव येथून पोलीस बंदोबस्त मागवा लागतो पोलीस येण्यास खूप मोठा वेळ लागतो, त्यामुळे खूप मोठे गुन्हे घडतात , कायदा सुव्यवस्था आटोक्याच्या बाहेर जाते, आणि त्या परिसरातील भांडणे तंटे चोऱ्या, दरोडे, खून या संदर्भात गुन्हे दाखल करण्यासाठी 35 किलोमीटर अंतरावर जावे लागत होते, त्यावेळच्या लोकप्रिय आमदार माजी मंत्री राहिलेल्या सौ. प्रतिभाताई पाटील काँग्रेस पक्षाच्या नेत्या त्यांच्या सरकार दरबारी जनतेचे सेवक या नात्याने आपली जबाबदारी म्हणून त्यावेळी चे अंदमान निकोबार म्हणून विरोधीपक्ष कडून टोमणे मारले जात  कुऱ्हा काकोडा परिसरआणि आदिवासी व आर्थिक दृष्ट्या व शिक्षणाचा अभाव नव्हता अशा दुर्गम भाग परिसरात जनतेसाठी सोयीचे व्हावे, या दूरदृष्टीने सौ प्रतिभा ताई पाटील यांनी कुऱ्हा काकोडा येथे पोलीस स्टेशन साठी प्रयत्न केले होते, परंतु मुक्ताईनगरजवळ असल्या कारणाने एकाच तालुक्‍यात दोन पोलीस स्टेशन करता येत नाही म्हणून महाराष्ट्र शासनाने व गृहविभागाने कुऱ्हा काकोडा या गावी पोलीस दूरक्षेत्र आऊट पोस्ट ( पोलीस चौकी) निर्मिती केलीआहे , तेव्हापासून ते आतापर्यंत गेली 75 वर्ष झाली कुऱ्हा  गावामध्ये एकही खून (मर्डर ) झालेला नव्हता, मात्र आता एक वर्ष झाले कुऱ्हा गावातील राजकीय व्यक्ती सर्व समाजाला सोबत घेऊन चालणारे व्यक्तिमत्व श्री दिनकर ओंकार पाटील (डि,ओ पाटील)
 ग्रामपंचायत चे लोक प्रतिनिधी ते  मुक्ताईनगर  पंचायत समिती सभापती पदापर्यंत त्यांचा राजकीय प्रवास त्यांचा प्रवास

    या कुऱ्हा काकोडा परिसरातील कायदा-सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न गंभीर झालेला आहे, गावठी दारू, (ऑक्सिटोंन) म्हशीचे इंजेक्शन पासून तयार केलेली दारू, बनावट ताडी देशी-विदेशी बनावट याचपरिसरात बनवण्याचे छोटे-मोठे कारखाने खूप मोठ्या प्रमाणात आहेत प्रत्येक गावांमध्ये  दारू व्यवसाय ची दुकाने आहेत सट्टा, पत्ते, मटका खूप मोठ्या प्रमाणात प्रत्येक गावांमध्ये यांचे दुकाने आहेत व्यवसाय जोरात चालतो.कुऱ्हा काकोडा या गावापासून विदर्भात सुरू होतो बुलढाणा जिल्ह्यामध्ये कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक येत असल्यामुळे त्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये संपूर्ण व्यवसाय बंद आहे, आणि त्यामुळे संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यातील जनता ही पूर्णपणे खानदेश मध्ये सुरू असलेल्या अवैध धंद्यांमध्ये सट्टा  पत्ता जिल्ह्यामध्ये संपूर्ण व्यवसाय बंद केल्या जात असतात आणि त्यामुळे संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यातील जनता ही पूर्णपणे खानदेश मध्ये सुरू असलेल्या अवैध धंद्यांमध्ये सट्टा पत्ते दारू याकडे वळतात आणि या परिसरामध्ये आपले ठाण मांडून बसतात, आणि या परिसरात आणखी व्यवसाय म्हणजे वन्यप्राण्यांच्या भरोशावर वाघ,  हरिण,  ससे, नीलगाय, रानटी डुक्कर, नागमणी, दोन तोंडी साप, कासव, काळी मांजर, तस्करीअशी अनेक वन्य प्राणी व यांच्या शिकार करून मास, अवयव विक्रीचे व्यवसाय चालतात काडी हळद असे अनेक व्यवसाय या परिसरात चालत असतात या सर्व व्यवसाय करणाऱ्या लोकांवर वरिष्ठ पातळीवरून पोलीस प्रशासन व वनविभाग थातुरमातुर कारवाई करून व  अर्थपूर्ण व्यवहार करून आणि  कोर्टामध्ये गुन्हे टिकणार नाही या हेतूने गुन्हे दाखल करून घेत असतात त्यामुळे या परिसरामध्ये छोटे-मोठे गुन्हे व गुन्हेगार गुन्हेगारीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे.या गुन्हेगारीमध्ये किशोरवयीन मुलांचा मोठा सहभाग आहे.कुऱ्हा परिसर प्रति बिहार म्हणून नावलौकिक होत आहे.

     या अशा प्रकारामुळे महिला, शाळकरी मुली, शेतातील मजूर,  छोटे-मोठे दैनंदिन व्यवसाय करणारे, डॉक्टर व्यवसाय करणारे, कपाशीचे व्यापारी, कडधान्याचे व्यापारी, कापड दुकानदार, मेडीकल असोशियन,  व शेतकरी वर्ग, सोन्या-चांदीचे व्यापारी, किराणा होलसेलर व्यापारी,असे अनेक छोटे-मोठे व्यवसाय करणारे व्यवसायिक व या परिसरातील सर्व क्षेत्रातील अधिकारी कर्मचारी त्यांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे जीवन जगणे मुश्किल झालेले आहे यावरून असे दिसून येते की "पोलीसांची अवैध धंदे बाबत हाताची घडी तोंडावर बोट"

       या सर्व बाबीचा विचार करून राज्य व केंद्र सरकारने या कुऱ्हा काकोडा  परिसराचा  सर्वेक्षण करून या ठिकाणी पोलीस स्टेशनची निर्मिती करण्यात यावी अशी मागणी या परिसरातील जनतेची आहे.




No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp