अडावद येथे कृषी विस्तार सेवा पदविका प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन.... - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

11/02/2022

अडावद येथे कृषी विस्तार सेवा पदविका प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन....

 

चोपडा (प्रतिनिधी) :--

  अडावद येथे कृषी विस्तार सेवा पदविका प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन

     चोपडा तालुक्यातील अडावद येथे मॅनेज (हैदराबाद),वनामती (नागपूर),आत्मा (जळगाव) आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत भगिनी मंडळ संचलित कृषी तंत्र विद्यालय, अडावद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कृषी विस्तार सेवा पदविका प्रशिक्षण केंद्राचा उद्घाटन कार्यक्रम संपन्न झाला.

    याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थावरुन बोलतांना माजी विधानसभा अध्यक्ष प्रा. अरुणभाई गुजराथी यांनी देशात कृषी संस्कृती अधिक सक्षम करण्याचे आवाहन केले.

      सदर अभ्यासक्रम हा एक वर्षाचा असून यात ४० प्रशिक्षणार्थींनी आपला प्रवेश निश्चित केला आहे. संपूर्ण देशभरातील कृषीतज्ञ या वर्गाला ऑनलाइन व प्रत्यक्ष मार्गदर्शन करणार असल्याचे प्राचार्य डाॅ.अनिल माळी यांनी सांगितले. या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून आत्मा, जळगावचे प्रकल्प उपसंचालक के. एन. तडवी तर विशेष अतिथी म्हणून घटक कृषि तंत्र विद्यालय, जळगाव येथील प्राचार्य डाॅ. एम. आर .बेडीस, माजी उपसंचालक पी. के. पाटील, माजी आमदार कैलास पाटील, दिलीप सोनवणे, उद्योगपती आशिषभाई गुजराथी, फर्टीलायझर असोसिएशनचे तालुकाध्यक्ष नेमीचंद जैन, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा विजयाताई पाटील, माजी जि .प .सदस्य विजय पाटील, साखर कारखान्याचे माजी चेअरमन घनशाम अण्णा पाटील, पीपल बँकेचे चेअरमन चंद्रहास गुजराथी, वसंतभाई गुजराथी यांच्यासह भगिनी मंडळाच्या अध्यक्षा पुनम गुजराथी, उपाध्यक्ष छायाबेन गुजराथी, उपप्राचार्य आशिष गुजराथी हे मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस. बी. पाटील व आभार प्रदर्शन सुनील गुजराथी यांनी केले.




1 comment:

  1. अत्यंत उपुक्त असा उपक्रम आणि अभ्यासक्रम आहे

    ReplyDelete

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp