निमखेडी बुद्रुक, कुऱ्हा काकोडा, वडोदा परिसरात खाजगी बांधकामांना वेग ,प्रशासनाचे अवैध रेती वाहतुकीकडे दुर्लक्ष... - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

12/02/2022

निमखेडी बुद्रुक, कुऱ्हा काकोडा, वडोदा परिसरात खाजगी बांधकामांना वेग ,प्रशासनाचे अवैध रेती वाहतुकीकडे दुर्लक्ष...

 

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) कैलास कोळी :--

    निमखेडी बुद्रुक, कुऱ्हा काकोडा, वडोदा परिसरात खाजगी बांधकामांना वेग ,प्रशासनाचे अवैध रेती वाहतुकीकडे दुर्लक्ष...

    निमखेडी बु !! कुऱ्हा, वडोदा या परिसरात प्रत्येक गावात खाजगीव सरकारी बांधकामे जोरात सुरू आहे मात्र बांधकासाठी लागणारे मटेरियल रेती, गिट्टी  मुरूम हे खूप मोठ्या प्रमाणात वापरत आहे.मात्र मुक्ताईनगर तालुक्यात जिल्हाधिकारी यांनी वाळू गट निश्चित केलेले नाही आणि मागील वर्षी लिलाव सुद्धा झालेला नाही बॅकवॉटर चे पाणी असल्यामुळे जिल्हाधिकारी यांनी लिलाव केलेले नव्हते, तरीसुद्धा  हजारो च्या संख्येने ट्रॅक्टर द्वारा अवैध वाळू वाहतूक सुरू असते मात्र शेकड्याने सुद्धा महसूल विभागाने ट्रॅक्टर पकडले नाही. तपास सुद्धा केलेला नाही. अर्थपूर्ण व्यवहार झाल्यामुळे की काय कारवाई मात्र स्वतःचे नोकरीवर गदा येऊ नये म्हणून तुटपुंजी स्वरूपाचे कारवाई  तहसीलदार श्वेता संचेती यांनी केल्याचे बोलले जाते.

 

      ज्या अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यानी तहसीलदार साहेब श्वेता संचेती पाकीट पद्धत ठेवलेली होती त्यांना मात्र मोकळे रान केले होते, त्यांनी हजारो प्रमाणात वाळू साठा केलेला होता त्यांच्यावर मात्र कारवाई केलेली नाही, फक्त देखावा करून मी काहीतरी करते आहे असे दाखवून स्थानिक पोलिस पाटलांना त्या ठिकाणी देखरेख करायला लावून त्या ठिकाचे  संरक्षण करावेअसे आदेश त्यांना देण्यात आले होते.पंचनामे करून सील केलेले अवैद्य वाळूचे साठे  गेले कुठे? मात्र नंतर काय झाले?  त्या वाळू साठ्याचे कोणी डल्ला मारला? हे मात्र गुलदस्त्यात आहे 

 

   लाखो रुपयाचा शासनाचा महसूल बुडवणाऱ्या अधिकारी-कर्मचारी याच्या वर कोणत्या स्वरूपाचे वरिष्ठ पातळीवर चौकशी सुद्धा केलेली नाही तर कारवाई काय करणार? मात्र एकमेव कारवाई कुरुदा येथील तलाठी जे एस सुरवाडे नामक व्यक्तीवर करण्यात आली होती. त्यांची व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्यामुळे त्यांच्यावर प्रांत अधिकारी यांनी कारवाई केली होती बाकी मात्र भ्रष्ट रॅकेट वरिष्ठ पातळीवरून पाठीशी घालण्यात आले होते.यांच्यावर पण कारवाई होणे उचित होती परंतु झाली नाही यालाच म्हणतात भ्रष्टाचार, भ्रष्टाचाराच्या माध्यमातून अवैध वाळू वाहतूक केलेले वाळू साठे आणि पंचनामा करून सील केलेले अवैद्य वाळू साठ्ये  तहसीलदार साहेबांच्या कृपेने निमखेडी बु, कुऱ्हा.. वडोदा परिसरात खाजगी व सरकारी बांधकामांसाठी अवैद्य वाळू वापरण्यात येत आहे.ज्या वाळू साठ्या वाल्यांनी पाकीट दिले नाही त्यांच्यावर तहसीलदार साहेब यांची करडी नजर असल्यामुळे त्यांच्यावरच कारवाई होत आहे असे दबक्या आवाजात बोलले जात आहे.

➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️

    मुक्ताईनगर तालुक्यामध्ये अवैध वाळू वाहतूकीच्या ढंपर व ट्रॅक्टरने पुर्नाड फाटा वर एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता मुक्ताईनगर मध्ये एका बालकाला चिडले होते त्याचा जागीच मृत्यू झाला होता.तरी सुद्धा तालुक्याचे तहसीलदार श्वेता संचिती एक महिलाअसताना  त्यांना काही दुःख झालं नाही नातेवाईकां नी पोलिसात तक्रार दिल्यामुळे त्यांच्यावर एक्सीडेंट चा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️



No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp