जळगाव जिल्ह्यातील निम्न तापी प्रकल्पाचे अभियंता श्री. विलास सुकलाल पाटील यांना शासनाचा "उत्कृष्ट अभियंता"पुरस्कार जाहीर... - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

13/02/2022

जळगाव जिल्ह्यातील निम्न तापी प्रकल्पाचे अभियंता श्री. विलास सुकलाल पाटील यांना शासनाचा "उत्कृष्ट अभियंता"पुरस्कार जाहीर...

 

जळगाव (प्रतिनिधी) :--

       जळगांव जिल्हातील निम्न तापी प्रकल्पाचे उप अभियंता श्री. विलास सुकलाल पाटील यांना शासनाचा "उत्कृष्ट अभियंता"’ पुरस्कार जाहीर...

    महाराष्ट्र राज्याच्या जलसंपदा विभागाच्या उत्कृष्ठ कामगिरी करणा-या अभियंत्यांना  ‘“अभियांत्रिकी सेवेतील उत्कृष्ट अभियंता"’ पुरस्कार दिले जातात.  राज्यस्तरीय  उत्कृष्ठ अभियंता पुरस्कार’ सोहळा दिनांक 11/02/2022 रोजी पुणे येथे संपन्न झाला. त्यात जळगांव जिल्हातील निम्न तापी प्रकल्पाचे उप अभियंता श्री. विलास सुकलाल पाटील यांना महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देवून उत्कृष्ठ अभियंता पुरस्कार’ ने गोरवणेत आले. विलास पाटील यांनी सपत्नीक पुरस्कार स्विकारला. सदर  “अभियांत्रिकी सेवेतील उत्कृष्ट अभियंता" पुरस्कार वितरण सोहळ्यास  श्री. जयंत पाटील मंत्री, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, श्री. विजयकुमार गौतम विशेष कार्य अधिकारी,श्री. विलास राजपूत,  प्रधान सचिव  (लाक्षेवि) व सचिव (प्रकल्प समन्वय), जलसंपदा प्रकल्प व विकास, जलसंपदा विभाग कार्यकारी संचालक प्रमोद मांदाडे यांची प्रमुख उपस्थितीती होती.  पुरस्कार सोहळ्याचे शासनामार्फ़त आयोजन ह, वि.गुणाले, मुख्य अभियंता, जल संपदा , पुणे यांनी केलेले होते.

    श्री. विलास पाटील यांनी सन 1984 मध्ये कनिष्ठ अभियंता या पदावर महाराष्ट्र अभियांत्रीकी संशोधन संस्था, (मेरी), नाशिक अंतर्गत महामार्ग संशोधन विभाग क्रं. 2 येथे प्रथम सेवेत सुरुवात केली. त्यांनी तेथे केंद्र शासनाच्या आर.-1 सर्वे ॲड इव्हॅअल्युशन ऑफ लोकली ॲव्हेलेबल मटेरीयल या योजनेत सहभाग  घेतला. हतनुर कालव्याची विविध कामे त्यांनी चांगल्या रितीने केलीत.  त्यात पडीत जागेत वृक्षारोपनाचा समावेश आहे. गुळ प्रकल्पाच्या वनजमीनीचा प्रस्ताव , प्रकल्पाच्या लोकसहभागातून पुनवर्सन ही अभिनव संकल्पनेत त्यांचा  मोलाचा सहभाग होता. प्रकल्पाचा केद्रीय जलआयोग, नियोजन आयोग मान्यता प्रस्ताव व वेगवर्धीत सिंचन लाभ कार्यक्रम (ए.आय.बी.पी.)केंद्रीय अर्थसहाय्य प्रस्ताव तयार करुन त्यांच्या पाठपुराव्यात तसेच कॉन्कर्न्ट ईव्हॅल्युएशन अहवाल तसेच ए.आय. बी.पी. पूर्णत्व अहवाल यात त्यांचा सहभाग होता.

    धुळे जिल्हात सेवेत असतांना अभिनव पध्दतीने सिंचन थकबाकी वसुली मोहीम राबवून विक्रमी वसूली, सिंचन क्षेत्रात वाढ,  जलजागृती सप्ताहात तालुकास्तरीय जलजागृती कार्यक्रमाचे आयोजन तसेच  विद्यार्थ्यांच्या भव्य  जलजागृती रॅलीचे आयोजन.अशी सिंचन व्यवस्थापनात त्यांनी उत्कृष्ठ कामगीरी केलेली आहे.पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल पालक मंत्री ना. गुलाबराव पाटील, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी  आमदार अनिल पाटील आमदार चिमणराव पाटील माजी शिक्षण मंत्रीआमदार अमरिशभाई पटेल , आमदार काशीराम पावरा माजी मंत्री विजय नवल पाटील आमदार लताताई सोनवणे, तापी महामंडळाचे कार्यकारी संचालक प्रमोद मांदाडे मुख्य अभियंता जयंत बोरकर अधीक्षक अभियंता यशवंतराव भदाणे कार्यकारी अभियंता  मुकुंद  चौधरी रोटरी एंकलेव चेअरमन एम. डबल्यू. पाटील यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी शेतकरी सहकारी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. विलास पाटील कार्य जवळून पाहणा-या शिरपूर तालुक्यातील निलाई प्रतिष्ठान चे अध्यक्ष जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते  तात्यासो श्री. सुरेश पाटील (भोरटेककर) यांनी आनंद व्यक्त करताना समाजाभिमुख कार्य करणाऱ्या हाडाच्या  अभियंता चा शासनाने सन्मान केला आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.




No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp